खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#Tri श्रावण शेफ चॅलेंज
इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
week-1
श्रावण स्पेशल रेसिपी क्र.2
मी हेमाताई ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली खवा पोळी.
घरातील सर्वांना आवडली.

खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)

#Tri श्रावण शेफ चॅलेंज
इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
week-1
श्रावण स्पेशल रेसिपी क्र.2
मी हेमाताई ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली खवा पोळी.
घरातील सर्वांना आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपखवा
  2. 1/4 कपपिठीसाखर.गोड हवे असल्यास वाढवू शकता
  3. 1 कपगव्हाचे पीठ
  4. थोडे पाणी
  5. 2-3 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 1/4 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    गव्हाचे पीठ चपातीसाठी मळतो. तसे मळून घेणे.पातळ नको. तूपाचा हात लावून घेणे व 15-20 मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    खवा पॅन मध्ये किसून घेणे. तो पॅन गॅसवर गरम करत ठेवावा.चमच्याने हलवत 10 मिनिटे परतवून घेणे.गॅस बंद करून थंड करत ठेवावे.

  3. 3

    थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिक्स करून पुरण तयार करून घेणे.पुरण पातळ वाटले तर थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावे.

  4. 4

    कणीक मळून घेणे व एक गोळा घेऊन त्याची वाटी करून घेणे. खव्याच्या पुरणाचे गोळे करून घेणे.कणकेच्या वाटीत पुरणाचा गोळा ठेवून बंद करून घेणे.

  5. 5

    कोरडे पीठ लावून पोळी लाटून घेणे.तव्याला तूप लावून त्यावर पोळी टाकणे.दोन्ही बाजूंनी तूप लावून छान भाजून घेणे.

  6. 6

    खाण्यासाठी तयार खवा पोळी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes