गोळा भात आणि कढी (gola bhaat ani kadhi recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#ks3
विदर्भ स्पेशल चटपटीत गोळा भात आणि कढी
ही महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूरची भाताची डिश आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन होती. मला नागपुरी गोळा भाता बद्दल माहिती घेऊन शिकणे आणि बनविणे खूप आवडले. 🙂
गोळा भात बनविणे खूप सोपे आहे आणि त्यांना बर्‍याच घटकांची आवश्यकता नाही. ताक किंवा कढी बरोबर हा गोळा भात खूप छान लागतो चला तर मग बघुया याची रेसिपी 👍

गोळा भात आणि कढी (gola bhaat ani kadhi recipe in marathi)

#ks3
विदर्भ स्पेशल चटपटीत गोळा भात आणि कढी
ही महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूरची भाताची डिश आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन होती. मला नागपुरी गोळा भाता बद्दल माहिती घेऊन शिकणे आणि बनविणे खूप आवडले. 🙂
गोळा भात बनविणे खूप सोपे आहे आणि त्यांना बर्‍याच घटकांची आवश्यकता नाही. ताक किंवा कढी बरोबर हा गोळा भात खूप छान लागतो चला तर मग बघुया याची रेसिपी 👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1कप तांदुळ
  2. गोळा साठी
  3. 1कप चणा डाळीचे पीठ (बेसन पीठ)
  4. 1टीस्पून लिंबाचा रस
  5. 1टीस्पून शेंगदाणा कुट
  6. 1टीस्पून किसलेलं सुकं खोबरं
  7. तेल
  8. 1टीस्पून अद्रक लसुण पेस्ट
  9. 1स्पून धने जिरेपूड
  10. 1/4टीस्पून हळद
  11. 1टीस्पून तिखट
  12. मीठ
  13. कोथिंबीर
  14. फोडणीसाठी :
  15. तेल
  16. 1टीस्पून मोहरी
  17. 1/2टीस्पून जीरे
  18. 1टीस्पून हिंग
  19. लाल मिरची
  20. कढीसाठी
  21. 2कप ताक
  22. 2टेस्पून बेसन पीठ
  23. आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर चा ठेचा
  24. मोहरी जीरे हिंग कडी पत्ता ची फोडणी
  25. 1टीस्पून साखर
  26. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर धने-जिरेपूड, शेंगदाण्याची शेंगदाण्याचे कूट आणि शेंगदाण्याचे कूट, किसलेले सुके खोबरे, हळद, तिखट घालून एकत्र करा. तेल घालून मिक्स करा. किंचित पाणी घालून कालवून घ्या.मिश्रण चिकट होईल इतकेच पाणी घाला. मिश्रण पात्तळ करू नका. घट्ट गोळा तयार करून घ्या.

  2. 2

    घट्ट गोळ्या पासून त्याचे चपटे छोटे गोळे तयार करून घ्या.१० मिनिटे आधीच तांदूळ धुवून ठेवा. पातेल्यात तेल गरम करा आणि जीरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला कि, धुतलेले तांदूळ घालून परता. ३-४ मिनिटे तांदूळ सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्या. तांदुळाच्या दुप्पट (इथे १ १/२ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून मिक्स करून झाकण ठेवून भात शिजवत ठेवा. भात पूर्ण शिजयच्या थोडा आधी, मिश्रणाचे चमच्याने १ १/२ " गोळे करून मध्ये मध्ये घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात पूर्ण शिजवून घ्या. भाताबरोबर गोळे सुद्धा शिजले जातील.

  3. 3

    जि-याचा खमंग वास आला कि, धुतलेले तांदूळ घालून परता. तांदुळाच्या दुप्पट (इथे १ १/२ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून घालावे. त्यामध्ये तांदूळ घालावा. झाकण ठेवून भात शिजवत ठेवा. भात पूर्ण शिजयच्या थोडा आधी, त्यामध्ये गोळे घालावेत. गोळे भाताखाली झाकून घ्यावेत. त्यामुळे गोळेही भाताबरोबर चांगले शिजले जातात. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात पूर्ण शिजवून घ्या. भाताबरोबर गोळे सुद्धा शिजले जातील.

  4. 4

    दुसरीकडे छोट्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, मोहरी जीरे हिंग घाला. मोहरी तडतडली कि, सुक्या मिरच्या घाला. फोडणी पूर्ण गार होऊ द्या.१५-२० मिनिटांनी फोडणी गार झाली कि भातावर सगळीकडे कोथिंबीर आणि फोडणी पसरून घ्यावी फोडणीतली मिरची आणि गोळा भातामध्ये कुस्करून गोळा भाताचा आस्वाद घ्या.
    खाताना वजनाचा विचार मात्र करू नका कारण. गोळा भातावर घ्यायच्या फोडणीमुळेच जास्ती मजा येतै.

  5. 5

    दोन कप ताका मध्ये दोन चमचे बेसन घालून ते नीट व्हिस्कर च्या साह्याने नीट मिक्स करून घेणे. लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर याचा ठेचा करून घ्यावा. एका पातेल्यामध्ये तेल जीरे मोहरी हिंग कढीपत्ता याची तेलामध्ये फोडणी तयार करून घेणे त्यामध्ये तयार केलेला ठेचा, चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा साखर टाकावी

  6. 6

    तयार फोडणीमध्ये बेसन लावलेले ताक घालून कढी उकळून घ्यावी कडी तयार झाल्यावर त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरावी. आपली चटपटीत कढी तयार आहे गोळा भाताबरोबर त्याचा आस्वाद घ्यावा

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes