गोळा भात (gola bhaat recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

विदर्भ स्पेशल गोळा भात
#KS3

गोळा भात हा आमच्या विदर्भाचा एक प्रसिध्द पारंपारिक प्रकार आहे. यात विविध मसाले वापरून बेसन पिठाचे गोळे केले जातात व ते भाताबरोबर शिजवले जातात. खाताना गोळा भातावर फोडणी टाकतात व चुरून खातात. सोबत ताक किंवा कढी असते. तुम्हाला खिचडी किंवा वरण भाताचा कंटाळा आला असेल तर गोळा भात हा छान पर्याय आहे.
गोळा भात हा खूप छान अप्रतिम असा लागतो एकदा तुम्ही करून व खाऊन नक्की बघा😀

गोळा भात (gola bhaat recipe in marathi)

विदर्भ स्पेशल गोळा भात
#KS3

गोळा भात हा आमच्या विदर्भाचा एक प्रसिध्द पारंपारिक प्रकार आहे. यात विविध मसाले वापरून बेसन पिठाचे गोळे केले जातात व ते भाताबरोबर शिजवले जातात. खाताना गोळा भातावर फोडणी टाकतात व चुरून खातात. सोबत ताक किंवा कढी असते. तुम्हाला खिचडी किंवा वरण भाताचा कंटाळा आला असेल तर गोळा भात हा छान पर्याय आहे.
गोळा भात हा खूप छान अप्रतिम असा लागतो एकदा तुम्ही करून व खाऊन नक्की बघा😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पस्तीस मिनिटे
चार ते पाच
  1. 2 वाटीतांदुळ
  2. 1 वाटीबेसन
  3. 1/2 वाटीदही
  4. आले लसुण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनमोहरी
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 1 टेबलस्पूनमोहरी
  8. 1 टेबलस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1 टेबलस्पूनधने पावडर
  11. हिंग
  12. 3-4 टेबलस्पून तेल
  13. चवीनुसारमीठ
  14. आवश्कतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

पस्तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  2. 2

    तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे नंतर एक जाड बुडाचे भांडे घेऊन त्यात तेल टाकून हिंग व हळद टाकावी दोन कप पाणी व एक चमचा दही घालावे

  3. 3

    आता यात धुतलेले तांदूळ टाकून भात शिजवण्यासाठी ठेवून द्यावे

  4. 4

    आता गोळे करण्यासाठी बेसन एका मोठ्या बाउल मध्ये घ्यावे त्यात अर्धा टी स्पून हळद आले-लसूण पेस्ट तिखट धने पावडर व एक चमचा दही घालून दोन टेबलस्पून तेल घालावे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे वाटल्यास अगदीं एक चमचा पाणी घालावे कोथिंबीर घालून मळून घ्यावे व त्याचे हातावर बोटाने दाबून गोळे करून घ्यावे

  5. 5

    आता भात अर्धवट शिजला की त्यात हे गोळे टाकून घ्यावे म्हणजे गोळे पण भाताबरोबर छान शिजतात

  6. 6

    गोळे शीजतात तोपर्यंत कढी करून घेऊया त्यासाठी दही घेऊन छान फेटून घेणे ताक तयार करून घेणे

  7. 7

    ताकात दोन तीन चमचे बेसन पीठ घालून मिक्स करून घ्यावे

  8. 8

    आता एक भांडे ठेवून घेऊन गॅस वर ठेवावे त्यात तेल टाकून जीरे टाकावे मिरची कडीपत्ता हिंग घालावे व ताक व बेसनाचे मिश्रण त्यात घालून फोडणी द्यावी वरतून कोथिंबीर टाकावी चवीनुसार मीठ व साखर घालावी झाली आपली कढी तयार

  9. 9

    दहा-पंधरा मिनिटांनंतर गॅस बंद करावा भात व गोळे छान शिजले

  10. 10

    भाताला तडका देण्यासाठी गॅस वर एक पॅन ठेवून या त्यात तेल टाकून जीरे मोहरी टाकावी तडतडले कि कढीपत्ता कोथिंबीर घालावी

  11. 11

    गोळे भातावर तडका टाकून छान कढी सोबत सर्व्ह करावा भात खाताना गोळे चुरून वरतून तेल टाकून भात खावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes