वॉलनट बाकलावा रोल (walnut baklava roll recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#walnuttwists
हे एक टर्कीचे प्रसिद्ध डेझर्ट आहे. ह्याचे खुप प्रकार तिथे मिळतात.माझा मुलगा नोकरी निमित्त तीकडे होता तेंव्हा आंम्हाला बाकलावाचे बरेच प्रकार टेस्ट करण्याचा व जवळून रेसिपी पाहण्याचा योग आला.
ह्यात वॉलनट चा वापर केल्याने आपणास रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, ओमेगा ३, स्मरणशक्ती वाढते असे बरेच फायदे होतात.

वॉलनट बाकलावा रोल (walnut baklava roll recipe in marathi)

#walnuttwists
हे एक टर्कीचे प्रसिद्ध डेझर्ट आहे. ह्याचे खुप प्रकार तिथे मिळतात.माझा मुलगा नोकरी निमित्त तीकडे होता तेंव्हा आंम्हाला बाकलावाचे बरेच प्रकार टेस्ट करण्याचा व जवळून रेसिपी पाहण्याचा योग आला.
ह्यात वॉलनट चा वापर केल्याने आपणास रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, ओमेगा ३, स्मरणशक्ती वाढते असे बरेच फायदे होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
  1. 1/2मेजरींग कप आक्रोड क्रश
  2. १२५ ग्रॅम मैदा
  3. ४० मीली तेल
  4. ४० ग्रॉम दही
  5. 1/2 टीस्पूनला थोडी कमी बेकिंग पावडर
  6. 1 टीस्पूनव्हिनेगर
  7. 1 टेबलस्पूनबीट केलेले अंड
  8. 2पींच मीठ
  9. 1/4मेजरींग कप दूध व पाणी मीक्स थोोडे कमी
  10. 1मेजरींग कप कॉर्नफ्लोअर
  11. 1 टेबलस्पूनमैदा
  12. १+१/४ मेजरींग कप साखर
  13. 3/4 कपपाणी
  14. १+१/२ इंच दालचिनीचा तुकडा
  15. 3-4 टीस्पूनलिंबाचा रस
  16. 2 थेंबआॅरेंज इम्लशन
  17. 1/4मेजरींग कप बटर
  18. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    प्रथम एक अंड बीट करून त्यातील १ टेबलस्पून अंड्याचे मिश्रण वेगळे काढून घेतले. एका बाऊलमध्ये तेल, अंड्याचे मिश्रण, व्हिनीगर, मीठ, बेकिंग पावडर, दही हे सर्व बीट करून घेतले.

  2. 2

    त्यात मैदा चाळून मीक्स करून त्यात दूध व पाण्याचे मिश्रण घालून फिलो शीटचा सैलसर डो तयार केला. व मैदा डस्ट करून मळून घेवून अर्धा तास झाकून ठेवला.

  3. 3

    आता कॉर्नफ्लोअर मधे १ टेबलस्पून मैदा मीक्स केला. फिलो शीट बनवण्यासाठी वरील डो चा रोल करून त्याचे १५ ग्रॅम चे पीसेस कट केले. व त्याचे गोळे बनवून १५ मिनिट झाकून ठेवले.

  4. 4

    मग स्वच्छ ओट्यावर गाळणीने कॉर्नफ्लोअर चे मिश्रण डस्ट केले.त्यावर एक गोळा ठेवून त्यावर पण कॉर्नफ्लोअर चे मिश्रण घातले व लहान पोळी लाटून त्यावर परत मिश्रण डस्ट करून झाकून ठेवले.अशा सर्व गोळ्यांच्या पोळ्या लाटून प्रत्येकीवर मिश्रण डस्ट करून झाकून ठेवले. म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही.

  5. 5

    मग परत ओट्यावर मिश्रण डस्ट करून त्यातील ५ पोळ्या घेऊन नीट एकावर एक करून परत डस्ट करून लाटले.आता मधून दोन वेळा मधून शीट उलट करून डस्ट केले व अतीशय पातळ लाटले.इथे सारखे डस्ट करणे फार महत्त्वाचे असते. म्हणजे शीट्स व्यवस्थीत सुटतात. असे सर्व फिलो शीट्स अगदी हळूहळू सोडवून वेगळे करून कपड्याखाली झाकून ठेवले.

  6. 6

    अशाप्रकारे सर्व फिलो शीट्स तयार करून घेतले. हे विकत घेतल्यास फारच महाग पडतात. पण आपण थोडी मेहनत घेतली व पेशन्सने काम केले तर आपण बनवू शकतो. आता बटर व तेल मिक्स करून थोडे गरम करून घेतले. मग एक शीट घेऊन त्यावर बटरचे ब्रशींग केले. आणि वरून अक्रोड क्रश पसरवले. व त्यावर लाटणे फीरवून घेतले.

  7. 7

    आता एक लांब स्टीक घेऊन ती रोलच्या एक साईडला ठेवली व हळुवारपणे टाईट असा रोल केला. मग तो रोल स्टीक वरच थोडासा स्ट्रेच केला व दोन्ही साईड ने जवळ करून त्याला रिंकल्स तयार केले आणि हळूच काढून घेतला.

  8. 8

    अशाप्रकारे सर्व रोल तयार करून ते एका ग्रीसिंग केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये लाईनीत रचून ठेवले. आता त्यावर मेल्ट केलेले कोमट असे बटर व तेलाचे मिश्रण सर्व बाजूनी घातले. ओव्हन 150 वर फ्री हिट करून मग त्यात रोल्स बेक करण्यासाठी ४५ मिनिट ठेवले.

  9. 9

    आता २० मिनिट बेक झाल्यावर शुगर सिरप तयार करण्यासाठी पॅनमध्ये साखर, पाणी, दालचिनी, लिंबाचा रस घालून उकळत ठेवले. चिकटपणा आल्यावरच किंवा साखर विरघळल्यावर थोडेसे उकळून गॅस बंद केला. व त्यात ऑरेंज इमल्शन मिक्स केले किंवा ऑरेंज झेस्ट अव्हेलेबल असल्यास ते घातले तरीही छान फ्लेवर येतो.

  10. 10

    आता बकलावा बेक झाल्यावर तो काढून मधून कट करून घेतले व त्यावर वरील शुगर सिरप सर्व बाजूंनी घातले. रोल्स त्यात व्यवस्थीत डुबले पाहीजेत. वरून थोडे पिस्ता, आक्रोड क्रश घातले. २-३ तास तसेच ठेवून दिले. ते लगेच घातले म्हणजे तसेच राहतात निघत नाही.

  11. 11

    आता अतिशय टेस्टी, टर्कीश डेझर्ट वॉलनट बाकलावा रोल ही रेसिपी तयार झाली. डीशमधे ठेवून वरून रोज पेटल्स घालून गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes