धपाटे (dhapate recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#ks5
मराठवाड्यातील माणसं प्रवासाला जाताना दशम्या व धपाटे हमखास घेऊनच निघतात. जगाच्या पाठीवर कुठेही राहणारा मराठवाड्यातील माणूस हा धपाटे प्रवासात सोबत ठेवतो खरं म्हणजे घरी बनवलेलंच खाणं योग्य हा यामागचा हेतू. मी पण सुट्टीला भारतात आले की निघताना माझी आई धपाटे व दाण्यांची चटणी सोबत देतेच....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 जणांसाठी
  1. 3 वाट्याज्वारीचं पीठ
  2. 1 वाटीकणीक
  3. 1/2 वाटीडाळीचे पीठ
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 2-3 टीस्पूनतिखट
  6. 2 टीस्पूनजिरं
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1 वाटीदही
  11. लागेल तसे दुध

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    एका भांड्यात ज्वारीचं पीठ कणीक,बेसन,तिखट, हळद, जिरं, हिंग घाला यात चिरलेली कोथिंबीर घालून दही मिक्स करावे. लागेल तसे दुध घालून पीठ भाकरीच्या पीठाप्रमाण पीठ मळून घ्यावे.

  2. 2

    आता पोळपाटावर भाकरी सारखेच धपाटे थापून तव्यावर भाजून आधी नुसते एका बाजूने भाजावे.

  3. 3

    नंतर थोडे तेल घालून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.दही, दाण्यांची चटणी, छुंदा, भाजलेले दाणे आणि खमंग धपाटे सर्व्ह करावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @Gholi1234
तुमची रेसीपी कुकस्नॅप केली व खुप छान झाली

Similar Recipes