दुधातला झुणका जैन स्पेशल (zhunka recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#EB2
#W2
मी जैन असल्याने या थीम मध्ये मी जैन स्पेशल दुधातला झुणका बनवला आहे.आमच्याकडे कोठेही बाहेरगावी जास्त दिवस प्रवासाला निघालो की हा दुधातला झुणका व दशमी हे पदार्थ हमखास ठरलेले असतात ,हे घेतल्याशिवाय बाहेर पडतच नाहीत ,कारण प्रवासात घरचं हक्काचं खायला मिळतं त्यात हे प्रवासात वातावरण बदलाने खराब होत नाही.तसेच कधीही भाजी नसेल किंवा आवडीची भाजी नसेल त्यावेळी हमखास हा दुधातला झुणका बनवला जातो ,तर मग पाहूयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदुध
  2. 1.5 वाटी बेसन
  3. 1 चमचालाल तिखट
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1/2 चमचाहिंग
  6. 1 चमचाजीरे
  7. 2 चमचेतिळ
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 चमचेकोथिंबीर
  10. फोडणीसाठी
  11. 4 चमचातेल
  12. कडीपत्ता
  13. मोहरी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा कढई गरम झाली की तेल घालून फोडणी करून घ्या जीरे -मोहरी-तीळ-हिंग-कडीपत्ता घालून घ्या,मग त्यात दूध ओता,दुधाला उकळी आली की त्यात लाल तिखट-मीठ-हळद घाला

  2. 2

    सगळं नीट मिसळून घ्या व मग मावेल तितके बेसन घाला व उलथण्याने हलवत रहा गुठळ्या होवू देऊ नका,बेसन घालून झालं की झाकन लावून एक वाफ काढून घ्या,व शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम दुधातला झुणका दशमी, चपाती,भाकरी,फुलका सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes