डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#AsahiKaseiIndia
#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.
डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे.

डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.
डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. डोसा साठी :
  2. 300 ग्रॅम तांदूळ
  3. 100 ग्राम उडदाची डाळ
  4. 50 ग्रॅम पोहे
  5. 1/2 टीस्पूनमेथी दाणे
  6. चटणी साठी :
  7. 1 वाटीओलं खोबरं
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 2 टीस्पूनकोथिंबीर
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1/2लिंबाचा रस

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    डोसा बनवण्यासाठी सकाळी तांदूळ, मेथी दाणे, पोहे आणि उडीद डाळ धुवून पाणी घालून भिजत ठेवले.

  2. 2

    रात्री ते भिजत घातलेले डाळ, तांदूळ, पोहे आणि मेथी बारीक वाटून एकत्र करुन चांगले फेटून, ते बॅटर फरमॅन्गनेट करण्यासाठी (पीठ फुगून यावे म्हणून) ठेवले.

  3. 3

    सकाळी डोसा बॅटर चांगले फुगून आले होते. त्यात मीठ घालून परत एकदा फेटून मग डोसा तव्यावर मीठाचे पाणी शिंपडून त्यावर एका डावलाने बॅटर घालून गोल पसरवले आणि खरपूस होईपर्यंत डोसा भाजून काढला.

  4. 4

    चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, कोथिंबीर. हिरव्या मिरच्या, मीठ आणि लिंबू पिळून त्यात २ टीस्पून पाणी घालून मस्त झणझणीत चटणी बारीक वाटून घेतली.

  5. 5

    एका प्लेटमधे गरमागरम कुरकुरीत डोसे ठेवून बरोबर मस्त झणझणीत चटणी सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes