दावणगिरी बेन्ने डोसा.. अर्थात दावणगिरी लोणी स्पंज डोसा. (sponge dosa recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #कर्नाटक

दावणगिरी-Heart of the Karnatak असे म्हटले जाते.. दावणगिरी हे कर्नाटक राज्यातील महत्वाचे शहर..Davanagere.. याचा अर्थ देवांची नगरी किंवा नगर असा होतो. दावणगिरी बेन्ने डोसा हे नाव या दावणगिरी शहरा वरूनच याला दिले गेले आहे.. बेन्ने याचा अर्थ लोणी किंवा बटर... आणि सढळ हाताने लोण्याचा किंवा बटर चा वापर या डोश्यामध्ये केला जातो..लोणी किंवा बटर वापरताना कुठे कंजुषी केली जात नाही त्यामुळे या डोशाची चव आणि वास वातावरणात कायमच रेंगाळत राहते. हा डोसा स्पंज सारखा मऊ जाळीदार आणि नेहमीच्या डोशापेक्षा आकाराने लहान ,जाड गुबगुबीत असतो. तामिळनाडू त्याचे नामकरण कल डोसा असेही आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर शहरांमध्ये हा डोसा खूप प्रसिद्ध आहे तिथे बरेचसे डोसा कॉर्नर आहेत त्याचप्रमाणे पुण्यात देखील हा डोसा अतिशय प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये साउथ इंडियन हॉटेल्स मध्ये हे डोसे मेनू कार्ड वर अग्रभागी आहेत
चला तर मग दक्षिण भारतातील नाश्त्याचा अतिशय पौष्टिक पोटभरीचा आणि लोण्याने माखलेला असा दावणगिरी बेन्ने डोसा आज आपण करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40मिनीटे
5 जणांना
  1. 3 कपतांदूळ
  2. 1/2 चमचामेथी दाणे
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 कपपोहे
  5. 1 कपबटर किंवा लोणी
  6. चटणीसाठी
  7. 1/2 कपओले खोबरे
  8. 2 टेबलस्पूनपंढरपूरी डाळ
  9. 1/4 कपकोथिंबीर
  10. 1 इंचआल्याचा तुकडा
  11. चार-पाच लसणाच्या पाकळ्या
  12. हिरव्या मिरच्या
  13. 1/2 टीस्पूनसाखर
  14. अर्ध्या लिंबाचा रस
  15. 1/2 टीस्पूनजीरे
  16. मीठ चवीनुसार
  17. फोडणीसाठी
  18. 2 टेबलस्पूनतेल
  19. 1 टीस्पूनमोहरी
  20. 1/2 टीस्पूनहिंग
  21. 5-6कढीपत्त्याची पाने
  22. 2लाल मिरच्या
  23. 1 टीस्पूनउडीद डाळ

कुकिंग सूचना

30-40मिनीटे
  1. 1

    प्रथम तांदूळ आणि मेथी एकत्र धुवून पाण्यात 6-7 तास भिजत ठेवा तसेच उडदाची डाळ देखील धुवून 3तास भिजत ठेवा. तसेच पोहे देखील अर्धा तास भिजवून ठेवा.

  2. 2

    नंतर मिक्सर वर तांदूळ किंचित जाडसर दळणे.. उडदाची डाळ बारीक वाटून घ्या तसेच पोहे देखील बारीक पेस्ट करून घ्या नंतर हे तिन्ही एकत्र करून चांगले एकजीव करून घ्या आणि आठ तास झाकण ठेवून आंबवायला ठेवा.

  3. 3

    आठ तासानंतर पीठ आंबलेले दिसेल.. आता यात मीठ घालून हलकेच मिश्रण एकजीव करा. हे पीठ जरा दाटसर असावे.

  4. 4

    आता मिडीयम आचेवर डोसा तव्या वर थोडे तेल लावून तवा ग्रीस करून घ्या.. आणि एका डावांमध्ये पीठ घेऊन वरून पीठ तव्यावर सोडा. आता डोशावर जाळी पडलेली दिसेल तेव्हा हाताने त्यावर घरचे पांढरे लोणी किंवा बटर घाला आणि लोणी वितळले कि डोसा दुसऱ्या बाजूने देखील चांगला भाजून घ्या

  5. 5

    मिक्सरच्या भांड्यात चटणी चे साहित्य घेऊन चटणी वाटून घ्या आणि त्यावर फोडणी देऊन चमचमीत चटणी तयार करा..

  6. 6

    आता एका प्लेटमध्ये दावणगिरी लोणी डोसा चटणी सांबार किंवा बटाट्याच्या माजी बरोबर सर्व्ह करा..

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes