उपवासाची राजगिरा भाजी (upwasachi rajgira bhaji recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#nrr
आपल्या सर्वांना तर माहीतच आहे राजगिरा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे .यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण प्रचंड असते. तसेच यात फायबर जास्त असल्यामुळे आपली पचन क्रिया सुधारते.ही भाजी दशमी बरोबर खायला खूप भारी लागते आणि मी ही भाजी लोखंडी कढई मध्ये केल्यामुळे ती खायला अजूनच रुचकर आणि पौष्टिक झाली आहे. चला तर पाहूया या पौष्टिक भाजीची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 जणांसाठी
  1. 1राजगिरा भाजीची गड्डी
  2. 1 चमचातेल
  3. 2 चमचेजाडसर शेंगदाणा कूट
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचामीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर राजगिरा भाजी निवडून घेणे. आपण मेथीची भाजी निवडतो त्याप्रमाणेच तिच्या शेंड्याकडील भाग निवडून घेणे. आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे. बाकीचे साहित्य जमवून घेणे.

  2. 2

    कढईमध्ये एक लिटर पाणी गरम करण्यास ठेवणे पाण्याला उकळी आली की भाजी कढई मध्ये टाकून दोन-तीन मिनिटे उकळून घेणे. व नंतर चाळणी मध्ये भाजी ओतून काढने.
    भाजी हाताने दाबून घेणे.म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल.

  3. 3

    आता त्याच कढईमध्ये तेल घालून बारीक कापलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे व भाजी घालने थोडे परतून घेणे. आता त्यात शेंगदाणा कूट व मीठ घालून थोडे परतने.

  4. 4

    थोड्यावेळाने भाजीतील पाणी कमी होते. तयार आहे आपली उपवासाची राजगिर्याची भाजी.

  5. 5

    अशीही राजगिरा ची भाजी उपवासाच्या दशमी बरोबर खायला खूप भारी लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes