प्रोटीन मिल्कशेक (protein milkshake recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #दूध किंवा दही
#दिवस_नववा #प्रोटीन_मिल्कशेक
#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏
शारदीय नवरात्र... नवरात्रातील नवदुर्गेचे सिद्धीदात्री हे नववे रुप ..
मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते. कुकपॅडच्या 9रात्रीचा जल्लोष या थीम अंतर्गत विविध की वर्ड दिले होते..त्यानुसार उपवासाच्या जरा वेगळ्या रेसिपी मी करण्याचा प्रयत्न केलाय..या वर्षी या थीम मुळे नवदुर्गेच्या नऊ रुपांच्या जास्तीत जास्त जवळ जाता आले आणि नवदुर्गांचे स्वरूप नव्याने न्याहाळता आले..नव्याने जाणून घेता आले.. 😊 🙏🌹🙏
9....सिद्धीदात्री- दुर्गेचे हे नववे रूप. ती सिंहवाहिनी चतुर्भुजा व प्रसन्नवदना आहे. मार्कंडेय पुराणात ज्या आठ सिद्धी सांगितल्या गेल्या आहेत त्या सर्व सिद्धी देणारी ती सिद्धीदात्री म्हणून ओळखली जाते..सिद्धिदात्रीला 'सिद्धिदा ' असेही म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनीटे
2जणांना
  1. 10-12बदाम
  2. 7-8काजू
  3. 5-6पिस्ते
  4. 4-5अक्रोड
  5. 5-6खजूर
  6. 3-4अंजीरे
  7. 2 कपदूध
  8. साखर चवीनुसार
  9. 5-6केशर काड्या
  10. काजू बदाम पिस्ते काप

कुकिंग सूचना

5मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एके ठिकाणी जमा करून घ्या

  2. 2

    एका पातेल्यात दूध घेऊन थोडे उकळून घ्या. गार करा..आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालून पावडर करून घ्या.हे मिश्रण थोडे सरबरीत ठेवायचे आहे.

  3. 3

    आता एका वाडग्यामध्ये वरील बारीक केलेले मिश्रण घेऊन त्यामध्ये दूध आणि साखर घालून व्यवस्थित ढवळा

  4. 4

    आता वरील मिश्रण केशर काड्या पिस्ता पूड घालून एकजीव करा तयार झाला आपला पौष्टिक असा प्रोटीन मिल्क शेक

  5. 5

    आता एका सरव्हिंग ग्लासमध्ये वरील प्रैटीन मिल्कशेक ओतूश काजू, बदाम, पिस्ते घालून गार्निश करुन थंडगार सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes