गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे (anarse recipe in marathi)

"गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे"
मी अनारसे रेसिपी यापुर्वीही एकदा पोस्ट केली आहे पण तेव्हा खसखस फ्रिजमधून काढून लगेच वापरली आणि त्यामुळे माझे अनारसे फसले होते..
म्हणून मला परत रेसिपी पोस्ट करायची आहे आणि हे एक किलो चे प्रमाण आहे..
गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे (anarse recipe in marathi)
"गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे"
मी अनारसे रेसिपी यापुर्वीही एकदा पोस्ट केली आहे पण तेव्हा खसखस फ्रिजमधून काढून लगेच वापरली आणि त्यामुळे माझे अनारसे फसले होते..
म्हणून मला परत रेसिपी पोस्ट करायची आहे आणि हे एक किलो चे प्रमाण आहे..
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ तीन दिवस तीन रात्र भिजत ठेवा.. दररोज पाणी बदलायचे आहे.. आणि पाणी बदलताना दोन वेळा पाणी घालून ओतून काढावे,मग पाणी घालून भिजत ठेवा.. चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढून एका चाळणीवर काढा.. अर्धा तास ठेवा म्हणजे सगळे पाणी निथळून जाईल.
- 2
आता एका सुती कपड्यावर पसरून घ्या. फॅन खाली फक्त दहा मिनिटांसाठी ठेवा.. जास्त सुकवायचे नाही. फक्त हाताला ओले (म्हणजे पाणी लागले नाही पाहिजे) नाही लागले पाहिजे.. दमट असावेत..
- 3
मिक्सरमध्ये बारीक वाटून मैदा चाळायच्या चाळणीने (सोजीच्या चाळणीने) चाळून घ्या..
- 4
तांदूळ मिक्सरमध्ये वाटण्या आधी गूळ सुरीने कापून घ्या व नंतर खलबत्त्याच्या दांड्याने किंवा वरवंट्याने चेचून घ्या.. म्हणजे पुर्ण बारीक होऊन थोडा पातळ होईल.. आणि मग तांदूळ वाटायला घ्या. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे..
- 5
सगळा गूळ एकदम घालू नये.. आधी अर्धा घालून मिक्स करावे..मग शिल्लक राहिलेल्या गूळ मधून पाव भाग घालून चांगले मिक्स करा..माझा पाऊण किलो मधून शिल्लक राहिला आहे
- 6
टिप...जर मिश्रण सुके वाटत असेल, तुमच्या पीठाचा गोळा झाला नाही तर पीठ मिक्सरमध्ये फिरवून घ्या.. लगेच गोळा तयार होईल.. पीठ पॅकबंद डब्यात घालून दोन तीन दिवस मुरत ठेवा.. आणि मग अनारसे बनवा.. पीठ फ्रिजमध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहाते.., फ्रिजमध्ये नाही ठेवले तरी पंधरा दिवस चांगले राहते.
- 7
बटर पेपर वर किंवा ताटात खसखस घेऊन पीठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊन हातावर थोडे थापून मग खसखस वर ठेवून बोटांच्या साहाय्याने गोल फिरवत अनारसे थापून घ्या..
- 8
मिडीयम टू लो गॅसवर तूप तापत ठेवा आणि अनारसे खरपूस तळून घ्या.. कढईतून काढल्यावर एका चाळणीवर ठेवा म्हणजे जास्तीचे तूप चाळणीतून निथळून जाईल.
- 9
तय्यार आहेत मस्त गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे..
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या