साट्याची रंगीत करंजी (satyachi karanji recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#dfr
#दिवाळी_फराळ_चॅलेंज

#साट्याची_रंगीत_करंजी

दिवाळी फराळाच्या गोड पदार्थांची महाराणी हा बहुमान अर्थात करंजीकडे जातो...😋😍..आपल्या संस्कृतीमध्ये करंजी शुभ शकुनाची मानली जाते.. त्यामुळे सर्व सणवार, लग्नकार्य,मुंजी यामध्ये या महाराणींना अगत्याचे बोलावणे असतेच असते..😍.. त्याशिवाय सण समारंभाला मजाच नाही..😊करंजी महाराणी साहेबांच्या आगमनाने सणाला ,समारंभाला चार चांद लागतात..आणि मगच सण परिपूर्ण झाल्या सारखा वाटतो..बरोबर ना..😍..चला तर मग करंजी महाराणी साहेबांना त्यांच्या लव्याजम्यासह अगत्याचे निमंत्रण द्यायला जाऊ या..आज माझा आनंद शतगुणित व्हायचं कारण की ही माझी *५०० वी रेसिपी*...😍😍❤️❤️..काल परवा सुरु केलेल्या प्रवासाचा आज इथपर्यंत पल्ला गाठला.. खूप आनंद वाटतोय..❤️..देवी अन्नपूर्णेच्या कृपेमुळेच हा आनंद माझ्या वाट्याला आलाय.. 🙏🌹🙏..Thank you so much Cookpad India, Cookpad Marathi Cooking community team,🙏💐🙏
Thank you so much dear Varsha Mam 🌹❤️,dear Bhakti Mam 🌹❤️
Thank you so much all my dear author friends n all my likers..😍🌹❤️...तुम्ही सर्व जण या माझ्या प्रवासाचे साथीदार आणि साक्षीदार आहात..😍❤️..Thank you so much once again..माझ्यावर असेच प्रेम कायम असू द्या...🙏🌹🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन तास
25-30 सर्विंग
  1. आवरणासाठी साहित्य
  2. 3/4 कपरवा
  3. 3/4 कपमैदा
  4. 1/2 कपदूध
  5. 4 टीस्पूनसाजुक तूप
  6. चिमुटभरमीठ
  7. गुलाबी खायचा रंग
  8. सारणासाठी साहित्य
  9. 2 कपसुक्या खोबर्‍याचा कीस
  10. 1/4 कपखसखस
  11. 1 कपपिठीसाखर
  12. 1/2 कपबारीक रवा किंवा कणिक
  13. वेलची पूड
  14. 2 टीस्पूनसाजूक तूप
  15. साठ्यासाठी साहित्य
  16. 6 चमचेकॉर्नफ्लॉवर
  17. 4 चमचेतूप
  18. करंज्या तळण्यासाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

दोन तास
  1. 1

    प्रथम रवा मैदा आणि मीठ एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घाला आणि चांगले मिक्स करून मळून घ्या आता थोडे थोडे दूध घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्या आणि दोन तास झाकून ठेवा

  2. 2
  3. 3
  4. 4

    तोपर्यंत कॉर्नफ्लोअरआणि तूप एकत्र करून चांगले फेटून घ्या. हा झाला आपला साटा तयार

  5. 5

    आता सारणासाठी खोबर्‍याचा किस मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजून घ्या खसखस भाजुन घ्या आणि खोबऱ्याचा कीस आणि खसखस मिक्सर मधून बारीक करून घ्या

  6. 6

    तुपावर बारीक रवा किंवा कणिक गुलाबी रंगावर भाजून घ्या हे मिश्रण गार झाल्यावर त्यात खोबऱ्याचा कीस खसखस वेलची पूड पिठी साखर घालून एकत्र करून सारण तयार ठेवा

  7. 7

    आता रवा मैदा मिश्रणाचा गोळा मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे तो मऊ होईल. याचे दोन भाग करून घ्या.एका भागात गुलाबी रंग घालून मिश्रण चांगले मळून घ्या आणि दुसरा भाग पांढरा ठेवा.

  8. 8
  9. 9

    आता गुलाबी रंगाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याची पोळी लाटा आणि ती बाजूला ठेवा त्याचप्रमाणे.पांढऱ्या रंगाची पण पोळी लाटून घ्या आणि बाजूला ठेवा..

  10. 10

    पोळपाटावर गुलाबी रंगाची पोळी पसरवा. त्यावर तयार केलेला साट्यातील थोडासा साठा घेऊन एक सारखा पसरवून घ्या. त्यावर पांढर्‍या रंगाची पोळी ठेवून एक सारखा साटा पसरवून घ्या. या दोन्ही पोळ्यांची घट्ट गुंडाळी करून घ्या आणि त्याचे सुरीने तुकडे करून घ्या. अशाप्रकारे सगळ्या लाट्या करून घ्या आणि त्यावर पाण्यात भिजवून घट्ट पकडले ओले कापड पसरून ठेवा. म्हणजे लाट्या कोरडे पडणार नाहीत

  11. 11

    आता यातील एक लाटी घेऊन त्याची पोळी लाटा आणि त्यात सारण भरून कडा घट्ट बंद करून कातणीने कापून घ्या.. त्याचबरोबर एक मोदकही करा कारण करंजी केली की मोदक करायचा आणि मोदक केला की एक करंजी करायची असते. असं शास्त्र आहे. कारण करंजी आणि मोदकाला बहिण-भाऊ समजतात.नंतर तापलेल्या तुपामध्ये मंद आचेवर या करंज्या खरपूस तळून घ्या. अशाप्रकारे सर्व करंज्या तळून घ्या.

  12. 12
  13. 13

    तळलेल्या करंज्या गार झाल्या की देवाला नैवेद्य दाखवून एका डिशमध्ये ठेवून सर्व्ह करा.

  14. 14
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes