तीळ गूळ करंजी (tilgud karanji recipe in marathi)

तीळ गूळ करंजी (tilgud karanji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे, तीळ भाजून घेणे. गूळ बारीक चिरून घेणे.शेंगदाणे मिक्सर मधून बारीक करून घेणे. तीळ ही बारीक करून घेणे. आता बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात गूळ घालून मिक्सर मधून एकजीव करून घेणे.
- 2
हे सारण एका बाउल मध्ये काढून त्यात वेलची पूड मिक्स करून घेणे. अशाप्रकारे करंजी चे सारण तयार झाले.
- 3
आता वरील आवरण तयार करण्यासाठी एका प्लेट मध्ये मैदा आणि रवा एकत्र करून घेणे. त्यात चिमूटभर मीठ आणि तूप घालून सगळ्या पिठाला ते तूप सगळीकडे चोळून घेणे.त्यात दूध किंवा पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेणे.व 1/2 तास झाकून ठेवणे.
- 4
आता करंजी करण्यासाठी मळून घेतलेल्या गोळया चे छोटे छोटे गोळे करून घेणे. त्यातील 1 गोळा घेऊन त्याची छोटी पातळ पुरी लाटून घेणे.
- 5
त्या पुरीत 1 ते दीड चमचा सारण घालावे. व हाताने एका बाजूने फोल्ड करून सगळ्या बाजू बंद करून घेणे. व ती करंजी पोळपाट वर ठेवून फिरकीने त्याचे कडा कापून घेणे.
- 6
अशाप्रकारे सगळ्या करंजी करून घेणे. आणि गॅस वर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल घालून करंजी मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेणे.
- 7
तळून घेतलेल्या करंज्या एका प्लेट मध्ये काढून घेणे.अशाप्रकारे मस्त खमंग स्वादिष्ट अशा तीळ गूळ करंजी तयार झाली.
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तिळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#dfrतिळाची करंजी खास दिवाळी साठी खुसखुशीत आणि शुगर फ्री करंजी Sushma pedgaonkar -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर#खमंग खुसखुशीत तीळगूळ पोळी सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 तीळ गूळ घ्या गोड गोड बोला Rupali Atre - deshpande -
खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 6 #करंजी #दिवाळीचा फराळ म्हटले करंजी शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे घातला करंजीचा घाट! Varsha Ingole Bele -
करंजी (Karanji Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळातील करंजी हा पदार्थ हमखास बनवला जातो.तसे तर चटपटीत पदार्थ सर्वांच्या आवडीचे असतात.पण गोड प्रकार म्हणून फराळाची सुरुवात या पदार्थांने होते. आशा मानोजी -
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा करंजी (rava karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post5 #रवा करंजीकरंजी दिवाळीच्या फराळ चा भाग असलेल्या गोड स्नॅक्सपैकी एक आहे. Pranjal Kotkar -
खोब्र मावा करंजी (kobra mawa karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा रेसिपीकरंजी वेगवेगळया प्रकारे केली जाते. आमच्या कडे विकत चा मैदा खात नाहीत.सासरी आणि माहेरी घरीच गहू ओले करून वळवतात आणि वाळवुन रवा मैदा काढतात. गहू दळून आणतात टोपल्याला कापड बांधून मैदा व रवा वेगळा काढतात.तर चला आपण करंजी चे साहित्य पाहुयात. MaithilI Mahajan Jain -
खाज्याची रंगीत करंजी... (karanji recipe in marathi)
#दिवाळी फराळ #100वीरेसिपी आजची माझी कुक पॅड वरील 100 वी रेसिपी... म्हणून मग कुछ मीठा हो जाये या शास्त्राप्रमाणे म्हटलं हा मान करंजीलाच मिळायला पाहिजे..आपल्या जीवनात करंजी, पुरणपोळी या खाद्यपदार्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक सणावाराला नैवेद्यासाठी करंजी कानवला,पुरणपोळी करतोच.करंजीचा आकार साधारण होडी सारखा ..तसंच संसाररुपी भवसागर तरुन जाण्यासाठी लवचिक आकार धारण करावा ही त्या मागची धारणा .भाजलेलं खमंग खोबरं आणि खसखस..त्याचा अलौकिक स्वाद,वेलची चा सुगंध,या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी तुपावर भाजलेली खमंग कणिक..हेच ते आनंदाचं सारण..करंजीच्या पोटातलं हे आनंदाचं सारण आतच रहावं ..बाहेर पडू नये तसेचकडवटपणा आत शिरु नये यासाठी घातलेली सुरेख नाजूक मुरड.खूप काही शिकायला मिळते यातून...आनंदाच्या सारणासारखं मनं पणसदैवगोडव्यानेभरलेलंअसावं..खोबर्याची,खसखशीची स्निग्धता, उर्जा आपल्याला चैतन्य प्रदान करते....कणिक जशी अंगभूत ओलाव्यामुळे सगळ्या सारणाला बांधून ठेवते..त्याचप्रमाणे आपल्या अंतरी ओल्या जाणिवांचं,स्निग्धतेचं चांदणं असेल तर आजूबाजूचं वातावरण त्या शीतल,मंद प्रकाशात न्हाऊन निघेलच आणि सगळीकडे मग चैतन्यमय वातावरणाची निर्मिती ठरलेलीच.. मन करा रे प्रसन्न सर्वसिद्धींचे कारण...या उक्तीप्रमाणे मनामधील हा आनंद ,ही प्रसन्नता कायम रहावी म्हणून हव्या त्या ठिकाणी आपल्या स्वभावाला परिस्थितीला करंजीसार मुरड घालता यायला हवी..ही मुरड म्हणजे मुरडीच्या आकाराप्रमाणे थोडं वाकणं झुकणं होय..ही मुरड असल्यामुळेच मनाचा पेला देखील आनंदाने उत्साहाने सदैव काठोकाठ भरलेला राहील..पटतयं ना ..आणि करंजी सारखाच खमंग खुसखुशीत पणा लाभून आपले व्यक्तिमत्व देखील केवळ आनंदाचा वर्षाव करेल... Bhagyashree Lele -
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण होऊच शकत नाही करंजी करायला जास्त वेळ लागतो चला तर मी माझ्या पद्धतीच्या करंज्या तुम्हाला कशा करायच्या ते दाखवते Chhaya Paradhi -
साट्याची रंगीत करंजी (satyachi karanji recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चॅलेंज#साट्याची_रंगीत_करंजी दिवाळी फराळाच्या गोड पदार्थांची महाराणी हा बहुमान अर्थात करंजीकडे जातो...😋😍..आपल्या संस्कृतीमध्ये करंजी शुभ शकुनाची मानली जाते.. त्यामुळे सर्व सणवार, लग्नकार्य,मुंजी यामध्ये या महाराणींना अगत्याचे बोलावणे असतेच असते..😍.. त्याशिवाय सण समारंभाला मजाच नाही..😊करंजी महाराणी साहेबांच्या आगमनाने सणाला ,समारंभाला चार चांद लागतात..आणि मगच सण परिपूर्ण झाल्या सारखा वाटतो..बरोबर ना..😍..चला तर मग करंजी महाराणी साहेबांना त्यांच्या लव्याजम्यासह अगत्याचे निमंत्रण द्यायला जाऊ या..आज माझा आनंद शतगुणित व्हायचं कारण की ही माझी *५०० वी रेसिपी*...😍😍❤️❤️..काल परवा सुरु केलेल्या प्रवासाचा आज इथपर्यंत पल्ला गाठला.. खूप आनंद वाटतोय..❤️..देवी अन्नपूर्णेच्या कृपेमुळेच हा आनंद माझ्या वाट्याला आलाय.. 🙏🌹🙏..Thank you so much Cookpad India, Cookpad Marathi Cooking community team,🙏💐🙏 Thank you so much dear Varsha Mam 🌹❤️,dear Bhakti Mam 🌹❤️ Thank you so much all my dear author friends n all my likers..😍🌹❤️...तुम्ही सर्व जण या माझ्या प्रवासाचे साथीदार आणि साक्षीदार आहात..😍❤️..Thank you so much once again..माझ्यावर असेच प्रेम कायम असू द्या...🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
-
-
करंजी (karanji recipe in marathi)
#GA4#week 9दिवाळी फराळात सर्व फराळ झाल्यावर मी शेवटी करंजी बनवते. करंजी बनवायला खूप पेशन्स लागतात . ती बनवायला ही खूप वेळ लागतो. इतर पदार्था पेक्षा ती लवकर खोबरे असल्या मुळे खराब होते. म्हूणन मी करंजी दिवाळीचे सर्व पदार्थ झाल्यावर बनवते. Shama Mangale -
पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
#GA4 #week9#fried#मैदाहा क्लू घेऊन आज दिवाळी फराळाची महाराणी करंजी बनवणार आहे तर तयार करयात पुडाची करंजी. पुड म्हणजे पदर करंजी ला जे पदर सुटतात त्याला पुडाची करंजी म्हटलं जातं. खस्ता अशी हि करंजी खायला जबरदस्त लागते. Supriya Devkar -
खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरमकर संक्रांत म्हंटले की तीळ गूळ हे झालेच पाहिजेत...त्यात तीळ आणि गूळ हे दोन्ही थंडीच्या दिवसात जाणवणारी थंडी शरीराला बाधू नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक सणाच्या गोडाधोडाचे पदार्थ निवडून ठेवले ले आहे...खूप हुशार होते आपले पूर्वज...तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता प्रधान करतात...सो त्यांनी थंडी बाधत नाही असेही म्हणतात...भोगी दिवशी आजही काही घरात अंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ घालून अभ्यंग स्नान केले जाते...असे हे थांडितले तिळाचे महत्त्व...तर आज मी ही साधी सोपी पारंपरिक तीळ गुळाची रेसिपी घेऊन अलिये तर पाहुयात रेसिपी...😊 Megha Jamadade -
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#५नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर करंजी रेसिपी शेअर करते. या पद्धतीने बनवलेली करंजी खूपच मऊ व रुचकर लागते. फक्त मैदा न वापरता यामध्ये बारीक रव्याचा वापर केल्यामुळे या करंजीला खुसखुशीतपणा येतो.तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘Dipali Kathare
-
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ही करणे अतिशय पौष्टिक असते थंडीच्या मोसमात दिवाळी येते आणि अशावेळी खोबरे खसखस हे ऊर्जा देणारे घटक करंजी मध्ये वापरले जातात त्यामुळे ही करंजी आपल्याला ऊर्जा देणारी ठरते चला तर मग आपण बनवूयात करंजी Supriya Devkar -
-
साठ्याची करंजी (sathyachi karanji recipe in marathi)
#dfrदिवाळीच्या फराळाची राणी म्हणजे करंजी! करंजी बनवताना आपल्याला खूप व्याप वाटतं पण करंजी खाल्ल्याशिवाय फराळ पूर्ण होत नाही तर घरातील सर्वांची मदत घेऊन छान करंजी बनवावी. Smita Kiran Patil -
-
खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर5दिवाळी फराळ मधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थान मिळाले आहे आपल्या करंजी ला...नाही का! Shilpa Gamre Joshi -
खीर करंजी
#tejashreeganesh आपण नेहमी मोदक करतो गणपती बाप्पा ला व गणपतीला भाऊ मानतात तर भावाला बहीण हवी मग सोबत करंजी पण करतो. पण इतके छान मोदक खाऊन झाल्यावर करंजी बिचारी मागे पडते. मग मागे पडलेल्या करंजीचा कायापालट करून थोडेफार नवीन पदार्थ अजून घालून ही रेसिपी माझ्या आई ने तयार केली. आमच्या घरात खीर खूप आवडते म्हणून तिला खीर करंजी अस नाव दिलं व मागे पडलेली करंजी अशी अशी संपली.महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी गुळात तयार केलेली आहे. GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
बनारसी करंजी (banarasi karanji recipe in marathi)
#gpबनारसी करंजी किंवा आम्ही याला पाकातील करंजी असे पण म्हणतो,आमची आई दिवळीलाही करंजी नेहमी बनवते, सारण करून करंजी आपण नेहमीच करतो पण ही करंजी आमच्या भावंडांची सर्वात आवडती अगदी मित्र मंडळी फराळाला आल्यावर सुधा ते अगदी आवडीने खातात बनारसी करंजी, मी आज बनवत आहे Smita Kiran Patil -
गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक # week 6चंद्रकोर म्हंटल कि मला करंजीची आठवण झाली मग काय केली करंजी. Bhanu Bhosale-Ubale -
ओल्या खोबर् याची करंजी (olya khobryachi karanji recipe in marathi)
#dfr ....#दिवाळी_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
टिप्पण्या (2)
My favorite 😋