मटार कोबीचे पराठे (matar kobiche paratha recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

मटार कोबीचे पराठे (matar kobiche paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 पराठा सारणासाठी कोबी चिरून
  2. 1 वाटीमटार
  3. 1कांदा
  4. 4 हिरवी मिरची बारीक चिरून
  5. 2 चमचेशेंगदाणे कूट
  6. 2 चमचेकोथिंबीर
  7. 7-8 कडीपत्ता पाने
  8. 1 चमचाहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 चमचाआलं-लसूण पेस्ट
  11. फोडणीसाठी तेल,जीरे ,मोहरी, हिंग
  12. 2 वाटीपराठा आवरणसाठी गव्हाचे पीठ
  13. 2 चमचेतेल
  14. 1/2 चमचामीठ
  15. पाणी गरजेनुसार
  16. पराठे भाजनेसाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सारणाचे साहित्य एकत्र करून घ्या,कोबी-कांदा-मिरची-कोथिंबीर चिरून घ्या,एक कढई गॅसवर ठेवा कढई गरम झाली की त्यात तेल घालून फोडणी करून त्यात कांदा-मटार-मिरची-आलं, लसूण पेस्ट घाला व परतुन घ्या ते परतून झाले 2 मिनिटे की मग कोबी घाला व तो परतुन घ्या

  2. 2

    मग त्यात हळद-मीठ-शेंगदाणे कूट घाला व सगळं छान मिसळून झाकण लावून एक वाफ काढून घ्या व शेवटी कोथिंबीर घाला म्हणजे तयार झाले आपले कोबी पराठा सारण,आवरणसाठी गव्हाचे पीठ घेवून त्यात मीठ-तेल-पाणी घालून कणीक मळून घ्या

  3. 3

    मळलेल्या कणकेचे गोळे बनवून घ्या,मग एक एक गोळा घेवून तो पुरी इतका लाटून त्यात आपण बनवलेलं सारण 2 चमचे भरून तो गोळा बंद करून घ्या

  4. 4

    मग त्या गोळ्याला कोरडे पीठ लावून पराठा लाटून घ्या,व मग तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या,व गरमागरम पराठा दही, शेंगदाणे चटणी,लिंबू लोणचं सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes