फोडणीचा मसाला आंबा (Fodnicha Masala Amba Recipe In Marathi)

#KKR
आंबा न खाणारे लोक फार कमी असावेत. आंबा हा कैरी आणि पिकलेल्या स्वरूपात खाल्ला जातो. सध्याच बाजारात कच्ची कैरी उपलब्ध आहे तर चला मग या कैरीचा झटपट बननारा चटपटीत असा फोडणीचा मसाला आंबा बनवूयात. याची चटपटीत चव तोंडाला पाणी आनते.

कुकिंग सूचना
- 1
आंबा साल काढून घ्यावा नंतर त्याचे बटाट्याच्या काचर्या करतो तसे काप करून घ्यावेत. आता फोडणीसाठी सर्व मसाला काढून घ्यावेत.
- 2
कढईत मोहरीचे तेल किंवा उपलब्ध असेल ते तेल घालावे तेल गरम झाल्यावर त्यात हिंग जीरे मोहरी मेच्या बडीशेप आणि थोडीशी धणेपूड घालावी मोहरी तडतडली यानंतर त्यात लाल तिखट आणि मीठ घालावे आणि लगेच आंब्याच्या घालून घ्यावेत
- 3
आंब्याच्या फोडी घातल्यानंतर सर्व मिश्रण एकदा हलवून घ्यावे नंतर त्यात चिरलेला गूळ घालावा आणि पुन्हा एकदा सर्व आता हलवून घ्यावे आता आंब्याच्या फोडी शिकण्याकरता थोडेसे पाणी पाणी घालावे
- 4
पाणी घालून झाल्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवर या फोडी शिजू द्याव्यात आंब्याची फोड शिरल्यानंतर गॅस बंद करा थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवावे तीन ते चार दिवस हे मिश्रण टिकते कोशिंबीर चटण्या ऐवजी हा एक सुंदर ऑप्शन उन्हाळ्यात आपल्याला मिळतो
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या