मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
आठ पराठे
  1. 1मुळा मध्यम आकाराचा
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1/2पालक जुडी
  4. 6ते सात लसूण पाकळ्या
  5. 1 इंचआले
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 वाट्यागव्हाचे पीठ
  8. तेल
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनधने जीरे पूड
  11. 1/2 टीस्पूनओवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम पालक मुळात स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया त्यामध्ये मिरची लसूण आले घालून सर्व बारीक पेस्ट बनवून घेऊयात आता त्या पेस्टमध्ये चवीपुरते मीठ हळद धने जीरे पूड तेल घालून गव्हाचे पीठ घालून घेऊयात

  2. 2

    सुरुवातीला कोरडेच मळून घेऊयात त्यानंतर लागेल तेवढे पाणी घालून कणीक मळून घेऊयात दहा मिनिटे रेस्ट होण्यास ठेवून नंतर पराठा लाटण्यास घ्यावा

  3. 3

    हा पराठा तव्यावरती छान दोन्ही बाजूनी शेकून तूप किंवा लोणी लावून भाजावा, सॉस चटणी किंवा टोमॅटोची भाजी सोबत हा पराठा खायला मस्त लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes