झटपट राजमा पुलाव (Rajma Pulao Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#CCR
धावपळीच्या जीवनात झटपट स्वयंपाक करताना आपण कुटुंबातील सदस्यांना कसा पोषक सकस आहार कमी वेळात बनवून देऊ शकतो. मग तो जरा चमचमीत ही असला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न. झटपट राजमा पुलाव.

झटपट राजमा पुलाव (Rajma Pulao Recipe In Marathi)

#CCR
धावपळीच्या जीवनात झटपट स्वयंपाक करताना आपण कुटुंबातील सदस्यांना कसा पोषक सकस आहार कमी वेळात बनवून देऊ शकतो. मग तो जरा चमचमीत ही असला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न. झटपट राजमा पुलाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 6तास भिजत ठेवलेला राजमा
  2. 2-3टाॅमेटो
  3. तमालपत्र
  4. जीरे
  5. 2-3लवंगा
  6. आलं-लसूण पेस्ट
  7. लाल तिखट
  8. गरम मसाला
  9. बियाऀणी मसाला
  10. 1-2मोठे कांदे
  11. 1 वाटीबासमती तांदूळ
  12. धणे
  13. आवश्यक ते नुसार पाणी
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम प्रेशर कुकरमध्ये झाकण न लावता २-३ चमचे तेल गरम करून त्यात तमालपत्र जीरे बारीक चिरलेला कांदा फोडणीत परतवून आलं लसूण पेस्ट, धणे-टाॅमेटो पेस्ट घालून कांदा चांगला सोनेरी रंगाचा होइपर्यंत परतवा.

  2. 2

    आता त्यात हळद,लाल तिखट, गरम मसाला, बियाऀणी मसाला, मीठ घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत ठेवा. नंतर त्यात ६तास भिजत घालून ठेवलेला राजमा घालून त्यावर १०मिनीटे भिजत ठेवलेला बासमती तांदूळ घालून वरुन २ मोठे कप पाणी घालून सर्व मिश्रण एकदाच हलक्या हाताने मिक्स करून कुकरचे झाकण लावून २-३ शिट्या दया.

  3. 3

    नंतर १० मिनिटांनी झाकण काढून भात चेक करा. गरमागरम पुलाव तयार. वरुन थोडी कोथिंबीर घालून सोनेरी सर खरपूस तळलेला कांदा वरून भुरभुरून सव्हऀ करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes