राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#DR2
डिनरसाठी "राजमा चावल " ही रेसिपी अगदी उत्तम रेसिपी आहे.येथे राजमा ग्रेव्हीला आपला महाराष्ट्रीयन टच अप देऊन बनविली आहे. चला तर बघुया! 😊

राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)

#DR2
डिनरसाठी "राजमा चावल " ही रेसिपी अगदी उत्तम रेसिपी आहे.येथे राजमा ग्रेव्हीला आपला महाराष्ट्रीयन टच अप देऊन बनविली आहे. चला तर बघुया! 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 लोकांकरिता
  1. राजमा ग्रेव्ही बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 वाटीराजमा (ओले)
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1/4ओले खोबरे (नारळाचा)
  6. 1/2सुख्या खोबऱ्याचा तुकडा (सुख्या खोबऱ्याच्या वाटीचा)
  7. 1 टेबलस्पून कसुरी मेथी
  8. 1 1/2 टेबलस्पून लाल तिखट
  9. गरम मसाला पावडर - 1tbs धने, ½ tbs जीरे, ¼ इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 6 काळिमारी, 3 पाकळ्या चक्रीफूल या सर्व साहित्याची एकत्रित पावडर
  10. 10लसूण पाकळ्या
  11. 1/4 इंचआल्याचा तुकडा
  12. मूठभरकोथिंबीर
  13. राईस
  14. 2 वाट्याबासमती तांदूळ
  15. खडा मसाला - ½ दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 5 काळीमिरी, 2-3 पाकळ्या चक्रीफूल
  16. 1 टीस्पून क्रश केलेले आले लसूण

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम राजमा हळद, मीठ घालून शिजवून घ्यावा. ग्रेव्ही साठी वर सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य भाजून मिक्सरला वाटून घ्यावे.

  2. 2

    गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून तमालपत्राची व कसुरी मेथी फोडणीला घालावी. त्यानंतर त्यात तयार केलेले वाटण परतावे. त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला पावडर घालून चांगले परतावे. कडेने तेल सुटू लागले की त्यात शिजलेला राजमा घालावा.

  3. 3

    राजमा ग्रेव्हीला उखळी येईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवावा. राजमाला उखळी आल्यानंतर पाच मिनिटे शिजू द्यावा. व गॅस बंद करावा.

  4. 4

    कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करून तमालपत्र, खडा मसाला, क्रश केलेले आले लसूण फोडणीला घालावे. त्यावर तांदूळ परतावा. तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून एक शिटी द्यावी

  5. 5

    त्यानंतर गरमागरम राईस (चावल) तयार राजमा ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करावा

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes