कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुरणाची साल काढून स्वच्छ धुऊन घेतले.सुरण हातात घेण्यापूर्वी हाताला तेल लावून घेतले म्हणजे हातांना चूळ सुटत नाही, खाज येत नाही. व त्याचे पातळ काप करून घेतले.
- 2
आता भागरीचे मिक्सरवर रवाळ पीठ करून ते एका थाळीत काढून घेतले आणि त्यात तिखट,मीठ व जीरेपूड मिक्स केली.
- 3
आता एका वाडग्यात चिंचेची चटणी घेऊन त्यात थोडे तिखट व काळे मीठ घालून मिक्स केले. व त्यामध्ये सुरणाचे काप घालून घोळून घेतले.
- 4
सुरणाच्या कापांना सर्व बाजूंनी चिंचेचे कोटिंग झाल्यावर ते काप भगरीच्या मिश्रणात घोळले आणि गॅस वरील तव्यावर थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी शालो फ्राय करून घेतले.
- 5
तयार उपवासाचे काप डिश मध्ये ठेवून सर्व्ह केले. हे वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट व टेस्टी होतात.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16632142















टिप्पण्या