गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#LCM1
गावरान झुणका हे नाव घेतल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटते. कुठल्याही प्रकारची गरमागरम भाकरी म्हटलं की झुणका त्या बरोबरीने आलाच. भाकरी आणि झुणका याची जोडी खूप पूर्वीपासून आहे. त्यात गावरान झुणका म्हणजे त्याला चुलीचा वास हवाच! पण आता घरोघरी चुली असणं शक्य नाही. म्हणून थोडाफार कोल स्मोक देऊन गावरान झुणका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

#LCM1
गावरान झुणका हे नाव घेतल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटते. कुठल्याही प्रकारची गरमागरम भाकरी म्हटलं की झुणका त्या बरोबरीने आलाच. भाकरी आणि झुणका याची जोडी खूप पूर्वीपासून आहे. त्यात गावरान झुणका म्हणजे त्याला चुलीचा वास हवाच! पण आता घरोघरी चुली असणं शक्य नाही. म्हणून थोडाफार कोल स्मोक देऊन गावरान झुणका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 वाटीजाडसर दळलेलं बेसन
  2. 3कांदे उभे पातळ कापून
  3. 1 वाटीबारीक चिरलेली कांद्याची पात
  4. 2 चमचेठेचलेला लसूण
  5. 2 चमचेबारीक चिरलेल्या मिरच्या
  6. 1 चमचालाल मिरची पावडर
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1/2 चमचाजीरे
  9. 1/2 चमचाराई
  10. 4पळी तेल
  11. मीठ आवश्यकतेनुसार
  12. थोडे कोळसे
  13. 2 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम बेसन कढईमध्ये कोरडेच भाजून घ्यावे आणि बाजूला ठेवावे. नंतर कढईमध्ये तेल घालून त्यात राई व जीरे फोडणीला घाला.व ते तडतडल्यावर लसूण घालावी आणि लसूण अगदी तांबूस होईपर्यंत परतून नंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून परतत राहावे.

  2. 2

    कांदा गुलाबी रंगावर परतल्यावर त्यात कांद्याची हीरवी पात घालून दोन मिनिट परतवून नंतर हळद आणि मिरची पावडर घालून नीट मिक्स करावे आणि मग भाजून घेतलेलं बेसन घालून आवश्यकतेनुसार मीठ घाला व सतत ढवळत रहा.

  3. 3

    झुणका कधी झाकून ठेवू नये. मधे मधे पाण्याचा शिपका मारावा आणि ढवळत राहावं असं करून सात मिनिटं झाल्यावर बेसन शिजल्याचा जाणवतं. तीन-चार वेळा पाण्याचे शिपके मारून सतत ढवळत राहिल्यावर बेसन शिजून येतं आणि त्याचबरोबर मोकळा -मोकळा असा झुणका हे तयार होतो त्याचा खमंग वास हेच ते शिजल्याचे लक्षण आहे.

  4. 4

    नंतर कढईमध्ये एका वाटीत कोळसा ठेवून त्यावर एक चमचा तेल घालून झाकून ठेवावे आणि असे केल्यामुळे थोडा चुलीचा वास झुणक्याला येतो. नंतर कोथिंबीर सजवून गरमागरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे.(घरात कोळसे नसल्यामुळे मी नारळाची सुकी करवंटी पेटवून त्याची निखारे तयार केले आणि ते वापरलेले आहेत)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes