अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#worldeggchallange
# अंडा बिर्याणी
ह्यासाठी मी अंड्याची बिर्याणी केली आहे. ह्यात घातलेले मसाले मी स्वतः घरी तयार केले आहेत. ही बिर्याणी अतिशय सुंदर आणि रूचकर झाली होती. ह्यात मी बासमती तांदूळ वापरला नसून साधा तांदूळ वापरला आहे.

अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)

#worldeggchallange
# अंडा बिर्याणी
ह्यासाठी मी अंड्याची बिर्याणी केली आहे. ह्यात घातलेले मसाले मी स्वतः घरी तयार केले आहेत. ही बिर्याणी अतिशय सुंदर आणि रूचकर झाली होती. ह्यात मी बासमती तांदूळ वापरला नसून साधा तांदूळ वापरला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 & 1/2 तास
3 माणसांसाठी
  1. अंड्याची ग्रेव्ही करण्यासाठी लागणारे साहित्य :-
  2. 3उकडलेली अंडी
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  6. 1-1/2 टेबलस्पून तिखट
  7. 1 टेबलस्पूनमीठ
  8. 4 टेबलस्पूनदही
  9. 1/2 टेबलस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनहोममेड मसाला
  11. 1/2 टेबलस्पूनहोममेड बिर्याणी मसाला
  12. 1/2 कपपाणी
  13. 4 टेबलस्पूनतेल
  14. चिमुटभरहिंग
  15. 1/2 टेबलस्पून धणे पावडर
  16. भात करायला लागणारे साहित्य :-
  17. 3-1/4 कप भिजवलेले तांदूळ
  18. 3-1/4 कप पाणी
  19. 1/4 टेबलस्पूनमीठ
  20. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  21. 1बड़ी वेलची
  22. 1हिरवी वेलची
  23. 1तमालपत्र
  24. 1/4 इंचदालचिनी
  25. 4लवंगा
  26. 7काळीमिरी
  27. 1/4 टेबलस्पूनशहाजीरे

कुकिंग सूचना

1 & 1/2 तास
  1. 1

    अंड्याची ग्रेव्ही करण्यासाठी प्रथम अंडी उकडून घ्यावीत. एका भांड्यात दही घ्यावे. त्यात धणे पावडर व तिखट घालावे.

  2. 2

    हळद, मीठ व अंडी घालून मीक्स करून घ्यावे.

  3. 3

    मॅगनेट केलेली अंडी 1/2 तास झाकून ठेवावी. 1/2 तासाने अंडी थोड्या तेलात परतून घ्यावी. 1कांद्याचे उभे पातळ काप करून घ्यावे. तेलावर कांदा लालसर रंगावर भाजून घ्यावा व त्याची पेस्ट करून घ्यावी. टोमॅटो गरम पाण्यात साले सुटेपर्यंत उकडून घ्यावेत व त्याची प्युरी करावी. अंडी मॅगनेट केलेले दह्याचे मिश्रण व इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात हिंग व आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.

  5. 5

    त्यात कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात हळद व टोमॅटो प्युरी घालावी.

  6. 6

    थोडे परतावे. त्यात दह्याचे मिश्रण, तिखट व होममेड मसाला घालावा.

  7. 7

    मीठ व पाणी घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यावर त्यात फ्राय केलेली अंडी घालून 5 मिनीटे शिजू द्यावे. बिर्याणी मसाला घालून गॅस बंद करावा.

  8. 8

    कांद्याचे व बटाट्याचे उभे पातळ काप करून घ्यावे. हे काप तेलात तळून घ्यावेत. होममेड बिर्याणी मसाला.

  9. 9

    भात करायसाठी प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 1/2 पाण्यात भिजत घालावेत. 1/2 तासाने तांदूळ उपसून निथळणी वर ठेवावे. केशर पाण्यात भिजत घालावे. सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे. गॅसवर एका पॅनमध्ये साजूक तूप घालावे. तूप गरम झाले कि त्यात खडे मसाले घालावे.

  10. 10

    सर्व मसाले फ्राय झाले कि त्यात पाणी घालून गॅसची फ्लेम मोठी करावी. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदूळ व मीठ घालून घ्यावे. मंद गॅसवर भात शिजवून घ्यावा. भातातील सर्व पाणी आटले की भात परातीत मोकळा पसरवून ठेवावा. 10 मिनीटात भात गार होईल. मग बिर्याणीचे थर लावायला घ्यावेत.

  11. 11

    आता बिर्याणी असेंबल करायला घ्यावी. प्रथम एका पॅनमध्ये तेल घालून घ्यावे. त्यात भाताचा थर पसरवून घ्यावा. त्यावर अंडी व ग्रेव्ही घालावी. त्यावर तळलेले बटाट्याचे काप घालावे. त्यावर पून्हा भाताचा थर पसरवून घ्यावा.

  12. 12

    त्यावर अंडी व ग्रेव्ही घालावी. भाताचा थर पसरवून घ्यावा. त्यावर केशराचे पाणी घालून घ्यावे.

  13. 13

    त्यावर तळलेले बटाट्याचे काप व तळलेला कांदा घालावा. वरून सगळीकडे तूप घालावे व झाकण ठेवून मंद आचेवर 1/2 तास बिर्याणी वाफवून घ्यावी.

  14. 14

    1/2 तासाने गॅस बंद करावा. बिर्याणी सर्व्हिंग वाटी मध्ये काढून त्यावर पुदीना व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्नीश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

Similar Recipes