रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#स्वीट रेसिपी
अर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई.

रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#स्वीट रेसिपी
अर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. 1/3 मेजरींग कप बारीक रवा
  2. 5 टेबलस्पूनसाखर
  3. ७५० मिली दुध
  4. १ १/२ टेबलस्पून ड्राय फ्रूट काप
  5. 1 टिस्पून वेलची पूड
  6. 7-8काड्या केशर

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम गॅसवर दूध उकळत ठेवले. गॅसवर दुसऱ्या साईडला पॅनमध्ये सीम गॅसवर साजूक तुपावर रवा भाजून घेतला.

  2. 2

    भाजून झाल्यावर त्यात थोडे दूध घालून मिक्स केले. मग हळूहळू दूध मिक्स करत सर्व दुध ओतले. असे केल्याने गाठी होत नाही. त्यात केशर दूध तसेच साखर घालून मिक्स केले. आणि आपल्याला हवी तशी घट्ट होईपर्यंत उकळले.

  3. 3

    रव्याची खीर घट्टसर झाल्यावर गॅस बंद केला. मग त्यात वेलची जायफळ पूड मिक्स केले. हि खीर थंड झाल्यावर जास्त घट्ट होते म्हणून थोडा आधीच गॅस बंद करावा. तयार रव्याची खीर बाऊलमधे काढून वरून ड्राय फ्रूट काप घालून सर्व्ह केली.

  4. 4

    अतिशय टेस्टी व झटपट होणारी ही खीर करायला पण सोपी आहे व साहित्य पण सहज उपलब्ध असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes