गुणकारी छोट्या माश्याची आमटी खा आणि निरोगी व्हा

छोटय़ा माशांमध्ये चरबीचं प्रमाण अतिशय कमी असून, त्यात प्रामुख्याने शरीरातील वाईट चरबी विरघळवणारं ‘ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स’ हे हृदयसंरक्षक रसायन द्रव्य मुबलक प्रमाणात आहे. वाढलेलं वाईट कोलेस्टेरॉल पुन्हा नियंत्रणात आणायला आणि पर्यायानं आरोग्याला अत्यावश्यक असल्याने, ते विविध प्रकारच्या विशेषत: बारीक माशांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. संधीवाताचे विकार, नैराश्य अशा आजारांवरही ‘ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स’ गुणकारी आहेत.वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते.

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य. मासे स्वच्छ करून घेणे
- 2
मिक्सर मध्ये धणे, चिंच, ओला नारळ, उभा चिरलेला कांदा, हळद, लाल मिरचीपूड छान बारीक असे वाटून घ्यावी
- 3
तेलावर बारीक चिरलेला कांदा परतवून मासे घालून केले वाटण ओतावे आणि एक उकळी काढावी. कधीही मासे जास्त ढवळू नये म्हणजे ते तुटणार / मोडणार नाही.
- 4
एक उकळी आली कि गरम गरम सर्व्ह करावी.
मालवणी माणूस माश्याची आमटी आणि भात जेवल्याशिवाय दिवस जावचो नाय तोंडाक लावक भिजलेलो मासो आणि हल्लीची फॅशन भात कमी जेव्हा म्हणून भाकरी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या