गुणकारी छोट्या माश्याची आमटी खा आणि निरोगी व्हा

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#सीफूड

छोटय़ा माशांमध्ये चरबीचं प्रमाण अतिशय कमी असून, त्यात प्रामुख्याने शरीरातील वाईट चरबी विरघळवणारं ‘ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स’ हे हृदयसंरक्षक रसायन द्रव्य मुबलक प्रमाणात आहे. वाढलेलं वाईट कोलेस्टेरॉल पुन्हा नियंत्रणात आणायला आणि पर्यायानं आरोग्याला अत्यावश्यक असल्याने, ते विविध प्रकारच्या विशेषत: बारीक माशांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. संधीवाताचे विकार, नैराश्य अशा आजारांवरही ‘ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स’ गुणकारी आहेत.वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५ जणांसाठी
  1. २५ /३० वेर्ले मासे
  2. दिड वाटी vओले खोबरे
  3. कांदा (अर्धा बारीक चरून आणि अर्धा उभा चिरलेला)
  4. अर्धा चमचा धणे
  5. पाव चमचा हळद
  6. दिड चमचा लहान मिरची पूड
  7. छोटाचिंचेचा गोळा
  8. २ चमचे तेल
  9. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य. मासे स्वच्छ करून घेणे

  2. 2

    मिक्सर मध्ये धणे, चिंच, ओला नारळ, उभा चिरलेला कांदा, हळद, लाल मिरचीपूड छान बारीक असे वाटून घ्यावी

  3. 3

    तेलावर बारीक चिरलेला कांदा परतवून मासे घालून केले वाटण ओतावे आणि एक उकळी काढावी. कधीही मासे जास्त ढवळू नये म्हणजे ते तुटणार / मोडणार नाही.

  4. 4

    एक उकळी आली कि गरम गरम सर्व्ह करावी.
    मालवणी माणूस माश्याची आमटी आणि भात जेवल्याशिवाय दिवस जावचो नाय तोंडाक लावक भिजलेलो मासो आणि हल्लीची फॅशन भात कमी जेव्हा म्हणून भाकरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes