स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या..
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या..
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी. ज्या ताटात वड्या करायच्या आहेत त्याला तूप लावून घ्यावे. एका जाड बुडाच्या मोठ्या कढईत तीळ टाकून ते भाजण्यासाठी गॅसवर ठेवावे.
- 2
तिळाचा छान सुवास येईपर्यंत ते भाजून घ्यावे आणि थोडे थंड करावे.
- 3
थंड झाल्यावर, फूड प्रोसेसर मध्ये टाकून बारीक करून घ्यावे. त्याची पेस्ट करू नये. त्यानंतर त्यातच किसलेला गूळ घालावा.
- 4
वेलची पूड टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 5
आता एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून ते गरम करावे. त्यात बारीक केलेले तिळगुळाचे मिश्रण टाकावे. आणि परतावे.
- 6
गुळ पातळ होईपर्यंत परतत राहावे. फक्त पातळ होईपर्यंत परतावे. त्यानंतर हे गरम मिश्रण, तूप लावलेल्या ताटात काढून घ्यावे. आणि चमच्याने, किंवा वाटी किंवा फुलपात्र ने प्लेन थापून घ्यावे.
- 7
त्यानंतर त्यावर आवडीनुसार सुकामेवा टाकून, पुन्हा एकदा प्रेस करून घ्यावे. त्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवावे.
- 8
थंड झाल्यावर, सुरीच्या साहाय्याने कडा सोडवून घ्याव्यात. आणि वड्या काढून घ्याव्यात. अगदी सोप्या पद्धतीने, पाक न करता, तिळगुळ वड्या तयार आहे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या