स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या..
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या..
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी. ज्या ताटात वड्या करायच्या आहेत त्याला तूप लावून घ्यावे. एका जाड बुडाच्या मोठ्या कढईत तीळ टाकून ते भाजण्यासाठी गॅसवर ठेवावे.
- 2
तिळाचा छान सुवास येईपर्यंत ते भाजून घ्यावे आणि थोडे थंड करावे.
- 3
थंड झाल्यावर, फूड प्रोसेसर मध्ये टाकून बारीक करून घ्यावे. त्याची पेस्ट करू नये. त्यानंतर त्यातच किसलेला गूळ घालावा.
- 4
वेलची पूड टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 5
आता एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून ते गरम करावे. त्यात बारीक केलेले तिळगुळाचे मिश्रण टाकावे. आणि परतावे.
- 6
गुळ पातळ होईपर्यंत परतत राहावे. फक्त पातळ होईपर्यंत परतावे. त्यानंतर हे गरम मिश्रण, तूप लावलेल्या ताटात काढून घ्यावे. आणि चमच्याने, किंवा वाटी किंवा फुलपात्र ने प्लेन थापून घ्यावे.
- 7
त्यानंतर त्यावर आवडीनुसार सुकामेवा टाकून, पुन्हा एकदा प्रेस करून घ्यावे. त्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवावे.
- 8
थंड झाल्यावर, सुरीच्या साहाय्याने कडा सोडवून घ्याव्यात. आणि वड्या काढून घ्याव्यात. अगदी सोप्या पद्धतीने, पाक न करता, तिळगुळ वड्या तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
संक्रांत जवळ आली आहे आणि मला माझ्या मैत्रिणीला तिळगुळ पाठवायचे असल्याने मी जरा लवकरच वड्या बनविल्या. Pragati Hakim -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR# मकर संक्रांत स्पेशल रेसिपी# तिळगुळ वडी Deepali dake Kulkarni -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्राती तिळगुळाचे लाडू, वडी,तिळगुळाच्या पोळ्या करतात 🤪मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏 Madhuri Watekar -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
-
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM1मी प्रगती हकीम ताईंची तिळगुळ वडी ही रेसिपि कुकस्नैप केली.मी फुटाणा डाळ पण घातली.मस्त झाल्या वड्या. Preeti V. Salvi -
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या.. Varsha Ingole Bele -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत spl कड्डम kuddam तिळगुळ वडी Charusheela Prabhu -
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर#तिळगुळाचे लाडू#लाडूतिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू. Shital Muranjan -
तिळगुळ वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळाचीवडीसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे.या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ.चला तर मग पाहूयात झटपट सोप्या पद्धतीने मऊ तिळाची वडी कशी करायची ते...😊 Deepti Padiyar -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांती साठी तिळगुळ#सो टेस्टी एडं हैल्दी । Sushma Sachin Sharma -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#मकर संक्रांतमकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे.पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतोमकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे.तिळगुळ लाडू विवीध भागात वेगवेगळया पद्धतीनें केले जातात गावाला हे लाडू करतातपण आम्ही येथे राहतो तिथे हे लाडू फार क्वचित करतात येथे फक्त पाकाचे लाडू करतातमकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहेतिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोलामजर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Sapna Sawaji -
पारंपरिक तिळगुळ लाडू (till gud ladoo recipe in marathi)
#मकर महाराष्ट्रात तिळगुळा च खूप महत्त्व आहे पूर्वी खलबत्त्या वरती तीळ कुटुन आणि छान मऊसर केलेला गुळा चे लाडू म्हणजेच पारंपरिक तिळगुळ असायचा आता आपण मिक्सर वर करतो आज मी मकर संक्रांति साठी विशेष खलबत्त्या वापरुन तिळगुळ केला आहे आणि चव पण अप्रतिम आहे R.s. Ashwini -
तिळगुळ वडी.. (teelgud vadi recipe in marathi)
#मकर धोरणी होते आपले पूर्वज..ऋतुमानानुसार पदार्थाची आखणी केली त्यांनी..शरीर त्या त्या ॠतूमध्ये काय खाल्ले प्याले की वातावरणाशी सामना करु शकेल याचा बारकाईने अभ्यास केला होता..आणि मग तोच पदार्थ नैवेद्य म्हणून करावा..हे सुद्धा सणांशी निगडित करुन त्याचे शास्त्र बनवले..खरंच खूप great👌👍 आता पौषाचा महिना म्हटला की थंडी आली म्हणून मग शरीराला उब मिळवून देणाऱ्या पदार्थांची त्यांनी योजना केली उदाहरणार्थ तिळ,गुळ डिंक मेथी अळीव. आणि मग त्याचे लाडू बनव,वड्या बनव ... तुम्हाला सांगते लहानपणीखलबत्त्यामध्ये चटण्या वगैरे कुटून देत असू.. आणि कुटताना गाणी म्हणत असू...कुटतानाचा तो नाद..एक वेगळी गंमत असायची..आईला मदत पण आणि आम्हांला व्यायाम पण.. पदार्थ कुटतानाचा तो वास तो दरवळ ..केवळ अहाहा..तसंच पाटा वरवंट्याचे..पाट्यावर वाटलेली चटणी..आठवली ना..काय चव असायची..पाट्यावर वाटलेले पुरण तर विचारूच नका..ती लय ,तो नाद सगळं मिस करतो आता मिक्सरमुळे.. पदार्थाचा जो वास सुटतो कुटताना..त्याची चव ,सर मिक्सरला नाही.. असो.. तर आज आपण बिना पाकाच्या मिक्सर वर बारीक केलेल्या कुटल्याचा feel देणार्या मऊसूत अशा कोणालाही सहज खाता येतील अशा तिळगुळ वड्या करु या.. तिळगुळ घ्या गोड बोला.. Bhagyashree Lele -
मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#cooksnapमऊसूत तिळगुळ लाडूDeepti Padiyar यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे...मी यात जायफळ ही टाकले आहे. याआधी मी पाकातले लाडू केले आहेत. मला ही रेसिपी खूप आवडली...लाडू होतात ही झटपट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात... Sanskruti Gaonkar -
तिळाची वडी (Tilachi Vadi Recipe In Marathi)
#TGR संक्रांत म्हटलं की तिळाची वडी आलीच तीळ हा उष्णवर्धक असतो त्यामुळे थंडीच्या काळात तीळ खाल्लेला चांगला तिळामुळे त्वचेला एक तेज येते चला तर अशी ही तिळाची आणि गुळ घालून आपण तिळगुळवडी बनवणार आहोत Supriya Devkar -
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#TGR #मकर संक्राती स्पेशल रेसिपी # लहान पणापासुन आमच्या घरी इतर सणांना पुरणपोळी बनवली जात असे पण मकर संक्रातीला खास तिळगुळ पोळीच माझी आई बनवायची तीच प्रथा मी आजही चालु ठेवली आहे माझ्या घरीही संक्रात म्हणजे तिळगुळ पोळीच चला तर मी बनवलेल्या तिळगुळ पोळी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar -
तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)
#मकर # संकांतीच्या निमित्ताने केलेल्या तिळाच्या वड्या! पाक न करता केल्या आहेत... Varsha Ingole Bele -
पिस्ता तिळपापडी (Pista Til Papdi Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रात स्पेशल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला ….वर्षाचा पाहिला सण संक्रांत sarv महिला तिळाचे लाडू, पोळ्या, वड्या बनवतात ..मी येथे खुसखुशीत वेलची पिस्ता टाकून तीळ पापडी बनवली . फटाफट बनते. कशी बनवायची ते पाहू … Mangal Shah -
तिळ, गुळ आणि शेंगदाण्याची वडी (til gul shengdana vadi recipe in marathi)
तीळ, शेंगदाणे आणि गूळ या तिघांमध्ये असे nutrients असतात जे बर्याच आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यांचे सेवन रोज सीमित मात्रेत केलेच पाहिजे. तर कोणी या तिघांचा समावेश करून गोड पोळ्या बनवतात किंवा कोणी लाडू बनवतात. वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपयोग करून आपण काहीही बनवू शकतो, तर मी आज याच्या वड्या बनवल्या आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. बनवून बघाल खूप छान होतात . आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आणि कमी वेळेत बनेल अशी आहे. Vaishu Gabhole -
तिळगुळ लाडू
#संक्रांतीतिळगुळाचे लाडू तर संक्रांतीला घरोघरी होतात माझे लाडू कसे झालेत बघा.तिळगुळ घ्या गोड गोड बोला,खास Cookpad साठी! Spruha Bari -
संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#LCM1संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी प्रत्येक ऋतूसाठी असे काही सण दिलेले आहेत की ज्यामुळे उत्साह वाढतो. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यात तीळातुन उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात. Anushri Pai -
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
तिळगुळ लाडू...बिनपाकाचे (tilgul laddu recipe in marathi)
#संक्रांती_स्पेशल_रेसिपी_कुकस्नँप_चँलेंज#Cooksnap#तिळगुळ_लाडू_बिनपाकाचेतिळा!!!!रूप तुझे इवलेसे मना-मनाला जोडणारे...राग सारा विसरून गोड बोलायला लावणारे...कण जरी एकच छोटुला सात जणांनी वाटून खाल्ला...दाखला देतात त्यावरूनच एकमेकांवरच्या प्रेमाला...मायेच्या माणसास अंतरता जीव तीळतीळ तुटतो...अलीबाबाची भलीमोठी गुहा मात्र चुटकीसरशी उघडतो...हलवून डोलवून गोड पाकात रूप देतात तुला काटेरी...करुनी दाग दागिना त्याचाच लेवविती आनंदे तनुवरी....तिळा!!! तुझी नी गुळाची आहे जशी अभेद्य जोडी...तशीच समस्त नात्यांची वाढू दे जीवनात गोडी... तर असे हे मानवी जीवनातील स्नेहाचे,गोडव्याचे प्रतीक तर दुसरीकडे थंडीमध्ये शरीरात ऊब निर्माण व्हावी म्हणून केलेली आहाराची योजना..माझ्या मुलाला पाकातल्या तिळगुळ लाडवांपेक्षा बिन पाकातले मऊसूत,खमंग तिळगुळ लाडू जरा जास्तच आवडतात..पाकातले खायला कष्ट पडतात म्हणे..😏 म्हणून कधी तिळगुळ वड्या तर कधी असे लाडू करते😋 या वर्षी मी माझी मैत्रीण आणि बहीण @Sujata_Kulkarni हिची खमंग,बिनपाकाचे, मऊसूत तिळगुळ लाडू ही रेसिपी मी cooksnap केलीये..सुजाता,खूप मस्तच झालेत लाडू...छान taste आलीये 😋😋👌.. Thank you so much dear for this delicious recipe😊🌹❤️ तिळगुळ घ्या गोड गोड बोला 😊🌹 Bhagyashree Lele -
More Recipes
टिप्पण्या