चवळीच्या भाजीचे आंबट गोड तिखट वरण
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरळाळ व मूगडाळ स्वच्छ धुवून कूकरला लावून 4/5 शिट्या करून शिजवून घेणे
- 2
डाळ शिजवून झाली की गॅस वरती कढई ठेवून त्यामधे तेल घालावे तेल गरम झाले की त्यामधे जिरे घालावे जिरे तडतडले की,ठेचलेला लसूण,चिरलेला कांदा,घालावे
- 3
कांदा तेलात गुलाबी रंगावर भाजून घ्यावे,नंतर त्यामधे हिरवी मिरची व हिंग,लालमिरची पावडर, हळद घालून परतून घ्यावे
- 4
नंतर त्यामध्ये चवळीची भाजी घालून भाजी तेलामधे परतून घ्यावे व त्यावर झाकण ठेवावे व भाजी 2/3 मिनिटे वाफवून घ्यावी
- 5
नंतर झाकण काढून घ्यावे व त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालावी व नंतर त्यामध्ये कोकम व गूळ घालावे
- 6
व आपल्या डाळ जेवढी पातळ कींवा घट्ट हवी त्यानूसार पाणी व चवीनुसार मीठ घालावे व डाळ 2/3 मिनिटे उकळून नंतर गॅस बंद करावा
- 7
अशाप्रकारे आपले चवळीचे आंबट तिखट गोड वरण तयार जे तूम्ही भातावर कींवा पोळी बरोबर खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गोड आंबट वरण (god ambat varan recipe in marathi)
#cooksnap# आज मी प्रगती हकीम ताईंची वरणाची रेसिपी cooksnap केली आहे. तसे तर आंबट गोड वरण नेहमीच करतो. पण आज ताईंच्या पद्धतीने करून पाहिले. छान झाले. मुख्य म्हणजे घरी आवडले...मी त्यात तिखट ऐवजी हिरवी मिरची, आणि आल्याचा कीस, लसुन ठेचून घातल्या. आणि चिंचे ऐवजी आमचूर पावडर टाकले आहे. Varsha Ingole Bele -
पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा आंबट गोड तिखट वरण# पश्चिम महाराष्ट्र#KS2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_भाजी "अंबाडी ची भाजी"मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चविष्ट फोडणीचे वरण
#goldenapron3ओळखलेला शब्द -dalरोजच्या जेवणात बनवता येणारी,करायला सोपी पण चविष्ट आणि जिभेला चव आणणारी रेसिपी आहे ही.फोडणीचे वरण गणपतीला भोग किंवा नैवेद्य म्हणून केले जाते. Varsha Pandit -
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe -
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफूडडे#माझीआवडतीरेसिपीचवळीची पालेभाजी माझी आवडती भाजी ..😋😋ही भाजी पोटातील आजारांसाठीही फायदेशीर आहे. हे बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित इतर समस्यांना दूर करण्यास मदत करते. हे पाचक प्रणाली मजबूत करते. पोटाच्या अनेक समस्यांसाठी चवळी फायदेशीर आहे.कोरोनाच्या काळात चवळीची पालेभाजी भाजी खाणे खूप फायदेशीर आहे. चवळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यासारखे बरेच पोषक घटक असतात. आयुर्वेदात अनेक रोगांसाठी चवळी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी चवळी फायदेशीर आहे.पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
लाल माठाचे शंकरपाळे
#edwan #TMB #पालेभाजी #goldenapron3 लाल माठ पौष्टीक असूनही बऱ्याचदा खाल्ला जात नाही.त्याचे शंकरपाळे लहान मुलांपासून मोठे सगळेच आवडीने खातात. आणि भाजी जर एडवण सारख्या ठिकाणाहून शेतातून ताजी ताजी आणली असेल तर त्याची मजा काही औरच.... Preeti V. Salvi -
शेवग्याच्या शेंगांची आंबट-गोड आमटी. (shevgyache shengache aambat god amti recipe in marathi)
#cooksnap # संपदा शृंगारपुरे # वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी करण्यास करिता मी आज संपदा शृंगारपुरे यांची शेवग्याच्या शेंगाची आंबट-गोड आमटी cooksnap केली आहे. यात मी चिंचेचा कोळ वापरण्याऐवजी आमचूर पावडर वापरलेले आहे...छान झाली आहे आमटी.. Varsha Ingole Bele -
तीळ, मुरमुरे लाडू (til mumre ladoo recipe in marathi)
#मकरसंक्रांतीला मुरमुरे लाडू करण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.विकत ही मिळतात.पण घरी 🏠 केलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो. Archana bangare -
-
-
बोरसुरी डाळ /भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5#मराठवाडारेसिपीजलातूरमधील निलंगा तालुक्यातील 'बोरसुरी'गावामध्ये पहिल्यांदाच हे वरण केल्याने बोरसुरी गावाच्या नावावरून 'बोरसुरी'हे नाव पडले.बोरसुरी गावातील लोकं म्हणतात ,तेथील पाण्याची चव इतकी चविष्ट आहे.त्यामुळे त्यांचे वरण खूप चविष्ट बनते.त्यामुळे आजूबाजूचे लोकं हे व्रत बनवण्यासाठी बोरसुरी गावातून पाणी आणातात.तेथे हे तर पाहूयात झणझणीत बोरसुरी वरण. Deepti Padiyar -
-
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे वरणलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, तूरडाळीबरोबरच इतर डाळींचा वापर करून केला जाणारा पदार्थ म्सणजे डाळभात, वरणभात. कोणत्याही आजारात पचनास हलकं म्हणूनही मूगाच्या डाळीचं वरण भाताबरोबर दिलं जातं. पण कोणत्याही व्हेज जेवणात या वरणाचे विविध प्रकार केले जातात आणि जेवणाची रंगत वाढवली जाते. मीसुद्धा विविध प्रकारे वरण करते. आजही अगदी साध्या पद्धतीचे फोडणीचे मी केले आहे, पाहूया रेसिपी. Namita Patil -
-
आंबट, तिखट, गोड कैरी करवंदाचे लोणचे (Kairi karvandache lonche recipe in marathi)
#MBR Neelam Ranadive -
चिवळी चा फुणका (chivli cha funka recipe in marathi)
#डाळचिवळ ही मुख्यत्वे करून उन्हाळ्यात मिळणारी पालेभाजी आहे अत्यंत शीतल धर्माची ही भाजी असल्याने उन्हाळ्यातील शरीरात होणाऱ्या उष्णतेला ही भाजी मारक ठरते Bhaik Anjali -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅपमेथीची भाजी मला प्रचंड आवडते .त्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या पद्धती वापरून मी भाजी करत असते.आज मी रंजना माळी मॅडम ची मेथी फ्राय भाजी कुकस्नॅप केली.खूपच छान झाली भाजी. Preeti V. Salvi -
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
तिखट आंबट गोड रगडा (Ragda Recipe In Marathi)
#स्ट्रिट फुड हा सगळ्यांच्याच आवडीचा भाग आहे. पण हायजेनिक दृष्ट्या ह्या गोष्टी घरी बनवल्या तर खुपच फायदेशीर व मनसोक्त खाता येतात चला तर अशीच तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी रगडा आज बघुया Chhaya Paradhi -
-
आंबट गोड सँडविच
गुढी पाडव्याच्या दिवशी केलेली बटाटा भाजी उरली v त्यापासून झटके पट तयार केलं सँडविच . #goldenapron3#leftover#week१० GayatRee Sathe Wadibhasme -
आंबट गोड शेवगा शेंगा (ambat god shevga shenga recipe in marathi)
#GA4#week25#drumstickपझल मधुन ड्रमस्टीक्स म्हणजेच शेवगा हा क्लु ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.शेवग्याला शेवगा,मोरींगा,मुणगा अशा नावानेही ओळखतात.अतिशय उपयुक्त अशा या शेंगा असतात.शेवगा आपल्या शरीराला खरच खुप उपयोगी आहे.चला तर या बहुगुणीशेवग्याच्या शेंगांची रेसिपी करूया... Supriya Thengadi -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
कैरी डाळ(आंबट गोड वरण) (Kairichii Dal Recipe In Marathi)
#KRR #कैरी रेसिपीस उन्हाळा म्हणजे सुरवातीला कैर्या व नंतर आंब्याचां सिजन कैर्या मार्केट ला आल्या की घरोघरी कैरीचे लोणचे , चटणी, आंबेडाळ, कैरीचे वरण, पन्ह असे अनेक प्रकार केले जातात चला तर आज आपण कैरीचे आंबट गोड वरणाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कोथिंबीर वरण (आमटी) (kothimbir waran recipe in marathi)
#डाळमाझ्या माहेरी पारंपरिक साध्या वरणाबरोबर तूरडाळ चे विविध प्रकारे वरण ( आमटी) केले जाते. यातलाच एक माझा अतिशय आवडता प्रकार म्हणजे कोथिंबीर घालून केलेले तूरडाळ वरण. कोथिंबीर वापरल्यामुळे या वरणाला फारच सुंदर चव आणि सुगंध येतो. करायला अगदी सोपे आणि तितकेच चविष्ट.( यात कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या दोऱ्याने बांधून टाकल्यास खूपच छान सुवास येतो)Pradnya Purandare
-
-
पातरी/पाथरी ची भाजी (patri chi bhaji recipe in marathi)
पातरीची भाजी शेतात खाली जमिनीलगत उगवते. काढून घेतल्यानंतर पुन्हा-पुन्हा उगवते.ही औषधी रानभाजी आहे. यात कॅल्शियम भरपूर असते. ही भाजी प्रतिकारशक्ती वाढवणारी असल्याने, लहान मुलांना खाण्यास द्यावी. हाडांसाठी उपयुक्त आहे.गुरांना चारा म्हणूनही देतात.शेतकरी ही भाजी कच्ची सुद्धा खातात.हि भाजी डाळ शेंगदाणे न घालता ही करतात. Sujata Gengaje -
गोड आणि तिखट चटणी
हलवाई कडून समोसा, ढोकळा अथवा कचोरी आणली की त्याच्यासोबत येणाऱ्या या दोन चटण्या आज मी केलेल्या आहेत. अगदी विकत आणतो तशाच या चटण्या चवीला लागतात. Pooja Kale Ranade
More Recipes
टिप्पण्या