पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना,
एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...
अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,
मग ढोकळा कसा होणार बरं,,,
डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,
आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...
पण मुल खातील का????
जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...
तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,
तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,
मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,
मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहा
मग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...
मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
  1. 1 कपमुगडाळ
  2. 1 टेबलस्पूनमसूर डाळ
  3. 1 टेबलस्पूनउडीद डाळ
  4. 2मिरची
  5. 1/2हळद
  6. 1 इंचआलं
  7. 1/2 टीस्पूनजिरे
  8. 1 टेबल स्पूनसाखर
  9. 1/2 कपआंबट दही
  10. 7,8पालकाचे पाने
  11. 1/4 कपकोथींबीर
  12. मीठ चवीनुसार
  13. 1 टेबलस्पूनइनो
  14. फोडणी साठी.....
  15. 3 टेबल स्पूनतेल
  16. 1 टेबलस्पूनसाखर,
  17. 2हिरवी मिरची
  18. 1 टेबलस्पूनमोहरी
  19. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  20. 1 टीस्पूनतीळ
  21. 1/2 टीस्पूनहिंग
  22. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    सर्व डाळी दोन तासापूर्वी भिजत घालावे...

  2. 2

    मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी त्यामध्ये मीठ चवीनुसार, अद्रक, हिरवी, मिरची, जिरे, दही घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे

  3. 3

    त्या डाळीच्या बॅटल चे दोन भाग करणे, एका बॅटल मध्ये हळद घालावी, पिवळा रंग येण्या करिता, दुसऱ्या बॅटल मध्ये पालक आणि कोथिंबीर घालावी, आणि मिक्सर मधून बारीक करून घ्यावे,
    म्हणजे त्याला ग्रीन कलर येईल

  4. 4

    इडली कुकर किंवा स्टीमर मध्ये पाणी घालून ते गरम होण्यास ठेवून देणे...

  5. 5

    आता येल्लो बॅटल मध्ये इनो फ्रुट सॉल्ट घालून मिक्स करून घेणे, आणि लगेच एका डब्यात किंवा एखाद्या पातेल्यात घालून ते लगेच स्टीमर मध्ये ठेऊन त्याचे झाकण बंद करून,ते 7 मिनिटापर्यंत होऊ देणे, सात मिनिटानंतर येल्लो बॅटल् चे पात्र काढून घेणे, यलो ढोकळा अर्धवट शिजला असेल,,,
    आत्ता ग्रीन बॅटल मध्ये इनो फ्रुट सॉल्ट घालून लगेच ते येल्लो बॅटल वर घालने,
    आणि लगेच ते टॅप टॅप करून स्टीमर मध्ये जाऊ देणे,,
    आता हे 20 मिनिटं वाफून घेणे

  6. 6

    आता आपल्या ढोकळा रेडी आहे,,त्याला डी मोल्ड करून घेणे...

  7. 7

    ढोकळा ला तडका देण्यासाठी पहिले गॅसवर कढई ठेवणे त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालून त्यामध्ये हिंग, मोहरी, हिरवी मिरची, तीळ आणि कोथिंबीर हे घालून नीट पर्तवणे,,
    आता याच्या मध्ये हाफ कप पाणी घालून त्याच्यामध्ये एक टीस्पून साखर घालावी..
    आणि याला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून देणे...

  8. 8

    हा तडका आता आपल्याला ढोकळ्यावर घालायचा आहे,
    आणि त्याचे पीसेस करायचे मनाप्रमाणे,,,
    वरून कोथिंबीर घालून आणि खायला द्यावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes