बाजरीपीठाचा हेल्दी मसाला पराठा (bajri pithacha healthy masala paratha recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

बाजरीपीठाचा हेल्दी मसाला पराठा (bajri pithacha healthy masala paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 जणं
  1. 2 कपबाजरी पीठ
  2. 1 टेबलस्पूनबेसन
  3. पाणी गरजेनुसार
  4. 1 टीस्पूनहिंग
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनधणेपुड
  7. 1 टीस्पूनजीरेपुड
  8. 2 टीस्पूनगरममसाला
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टेबलस्पूनसाजूक तुप
  11. 1कांदा बारीक चिरलेला
  12. 1/2 वाटीबारीक चिरलेली मेथी
  13. 1 टीस्पूनओवा
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. 1 टेबलस्पूनतेल
  16. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  17. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम बाजरी पीठ व बेसन एकत्र मिक्स करून घ्यायचे..त्यात हिंग,हळद,लालतिखट,धणेपुड,जीरेपुड,ओवा जरा हातावर घासून,मेथी,कोथिंबीर,कांदा,गरम मसाला,मीठ सगळे पदार्थ एकत्र करावे..1 टेबलस्पून तेल घालून पाण्याने सरसरीत भिजवावे.भज्यांच्या पीठापेक्षा थोडे पातळ पाहीजे.आणि हे मिश्रण 15 मिनिट झाकून ठेवावे.

  2. 2

    आता तवा गरम करून साजूक तुप घालावे व ह्या पीठाचे गोल पराठे टाकावे.दोन्ही बाजूने दाबून दाबून मंद गॅसवर बाजूने तुप सोडून शेकावे.हे पराठे छान फुगतात.

  3. 3

    ह्या प्रमाणात आठ पराठे होतात..बाजरी चे असल्यामुळे खूपच हेल्दी आहेत.कमी तेल व तुपात तयार होतात..

    आपले बाजरी पीठाचे चविष्ट पराठे तयार आहेत,लोणी कींवा लोणचे टोमॅटो केचप,कांदा मिरची सोबत सर्व्ह करायचे,खूप छान लागतात चवीला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

Similar Recipes