कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो धुऊन, त्याच्या लहान फोडी चिरून घ्याव्यात.
- 2
तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंगाची फोडणी करावी. त्यात चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ काढावी.
- 3
टोमॅटो थोडा मऊ झाल्यावर त्यात सुके मसाले, मीठ घालून एकत्र करावे. त्यात दोन कप पाणी घालून चांगली उकळी आणावी. त्यात शेव घालून दोन मिनिटे उकळवावे. नंतर गॅस बंद करून वर झाकण ठेवावे. गरमच पोळी किंवा घावण्या बरोबर खायला द्यावे. आवडत असल्यास यात थोडा गूळ घातला तरी चालेल. तिखट आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे. भाजी गरमच वाढावी, नाहीतर शेव सर्व पाणी शोषून घेते व सुकी होते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11867091




टिप्पण्या