गाजर मालपुआ

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#गुढी
#मालपुआ
मालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे.

गाजर मालपुआ

#गुढी
#मालपुआ
मालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जण
  1. मध्यम आकाराची गाजरे
  2. १/२ कप दूध
  3. ४ टेबल स्पून मिल्क पावडर
  4. ५ टेबल स्पून मैदा
  5. २ टेबल स्पून बारीक रवा
  6. १ टेबल स्पून मलाई/साय
  7. १ टेबल स्पून पिठीसाखर
  8. चिमूटभरमीठ
  9. लाल फूड कलर (हवा असल्यास)
  10. १/२ टि स्पून बेकिंग पावडर
  11. ड्रायफ्रूट्स
  12. पाकासाठी :
  13. १ कप साखर
  14. १ कप पाणी
  15. १/२ टि स्पून वेलचीपूड
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    गाजरे सोलून मध्ये उभे तुकडे करा, मधला भाग पिवळसर असेल तर तो सुरीने काढून टाका, (पिवळसर भाग असेल तर गाजर थोडे कडवट लागते.)

  2. 2

    तुकडे करून मिक्सरमध्ये थोडं दूध घालून पेस्ट करून घ्या. ती पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात मिल्क पावडर घाला.

  3. 3

    मैदा, बारीक रवा, मलाई घाला.

  4. 4

    लाल फूड कलर, मीठ, पिठीसाखर घाला. पाच मिनिटे झाकून ठेवा.

  5. 5

    पाक बनविण्यासाठी : साखर, पाणी घालून एकतारी पाक बनवा, त्यात वेलचीपूड घाला.

  6. 6

    पाच मिनिटानंतर मिश्रणात बेकिंग पावडर व राहिलेलं दूध घालून मिश्रण एकजीव करा.

  7. 7

    पॅन मध्ये तेल घालून तापत ठेवा. तापल्यानंतर त्यात १ चमचा मिश्रण घाला. असे ४ मालपुआ घालून घ्या. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी शिजवा

  8. 8

    शिजल्यानंतर झाऱ्यावर घेऊन वरून चमच्याने दाबून अतिरिक्त तेल निथळून घ्या. पाकात घालून ५ मिनिटे ठेवा.

  9. 9

    डिशमध्ये एकावर एक ठेवून सजवा. वरून ड्रायफ्रूट्स घाला. सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes