कुकिंग सूचना
- 1
तांदूळ व डाळ स्वच्छ धुऊन एकत्र करा. तांदळात पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, १टीस्पून तेल व तांदूळ-डाळीच्या तिप्पट पाणी घालून खिचडी शिजवून घ्या. खिचडी अगदी मऊ शिजायला हवी.
- 2
कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. तेल तापवून त्यात, राई-जिरे, हिंग, कडीपत्त्याची व लाल मिरच्यांची खमंग फोडणी करा.
- 3
फोडणीत कांदा व हिरव्या मिरच्या घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो व सुके मसाले घालून परता.
- 4
खिचडीला पळीने घोटून एकजीव करा.
- 5
टोमॅटो शिजून तेल सुटल्यावर तयार मसाला खिचडीवर ओतून चांगले ढवळून घ्या. वरून चिरलेली कोथिंबीर व साजूक तूप घालून गरमागरम खायला द्या. बरोबर दह्यातली कोशिंबीर, पापड, लोणचे म्हणजे मेजवानीच.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11960306




टिप्पण्या