मिल्क क्रंम्बल्ड डिलाईट (milk crumbled delight recipe in marathi)

#दूध
माझ्या 150 रेसिपीज पूर्ण झाल्या,,😎🤩
दुधाची थीम आली तेव्हा काय करावे हा प्रश्न पडला,,
बर रेसिपी केल्यावर नाव काय द्यायचे याचा पण मोठा प्रश्न 😝😝
कारण जनरली दुधाचे साधारण सर्व एकच एक प्रकार असतात,,
मी केलेला हा मिल्क डिलाईट हा काही खूप वेगळा नाहीये त्यातलाच आहे पण थोडासा फरक केलेला आहे माझ्या पद्धतीने,,
खूप दिवसापासून गोड हा प्रकार इतक्यात केला नव्हता,
मग विचार केला की चला दुधाच्या निमित्ताने काहीतरी वेगळा प्रकार करावा,,
हा माझा प्रयोग होता पण हा प्रयोग सफल झाला,
मुलांना हा प्रकार अतिशय आवडला...
खव्यापासून केलेला हा प्रकार चवीला अतिशय सुंदर झाला,
थोडेफार बदल केले बाकी काही नाही,,
तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसं झालं हे मिल्क डीलाईट,,,

कुकिंग सूचना
- 1
खवा करण्यासाठी फ्राय पॅनमध्ये तूप घालावे, त्यामध्ये दूध घालावे,
- 2
दूध गरम झाले की त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करणे, आणि हे सतत ढवळत राहणे, गुठळ्या होता कामा नये,
- 3
दूध आटल्या नंतर 6,7 मिनिट चांगलं भाजून घेणे, गॅस हा मंदच ठेवावा, नाहीतर खवा जळून जाईल, आता खवा लालसर झाला की त्यामध्ये साखर ऍड करावी, इथे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी-जास्त करू शकता,
- 4
साखर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटं परत मंद आचेवर भाजून घ्यावे, आता यामध्ये दूध ऍड करा, आणि सतत ढवळत रहा,
- 5
विलायची पावडर आणि कलमी पावडर ॲड करा, साधारण चार ते पाच मिनिटे मंद आचेवर परत यायला शिजू द्या, तुम्हाला जेवढे हे डिलाइट थीक पाहिजे तेवढे तुम्ही थीक करू शकता, मी साधारण पातळ पण नाही आणि थीक पण नाही, घट्ट बासुंदी सारखे ठेवले आहे,
- 6
आता मिल्क डिलाइट रेडी आहे, छान खव्याच्या बारीक बारीक गुठळ्या तयार झालेले आहे यामध्ये, ते खाताना अतिशय चवदार वाटते, त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स मनाप्रमाणे घालावे, अतिशय चविला सुंदर हा आगळावेगळा प्रकार करून बघा तुम्हाला खूप आवडेल,,
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)