मसाला चहा (masala chai recipe in marathi)

Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
Kalyan West.

#दूध
दूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.
पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.

असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 कपपाणी
  2. 1/2 कपदूध
  3. 4 टीस्पून साखर
  4. 2 टीस्पून चहा पावडर
  5. मसाला:
  6. 2काळी मिरी
  7. 1लवंग
  8. 1वेलदोडा / वेलची
  9. 1/2 इंचआलं
  10. 1/2 टीस्पून बडीशेप

कुकिंग सूचना

१०-१२ मिनिटे
  1. 1

    साहित्य: तुम्ही मापासाठी तुमचा नेहमीचा घरातला चहाचा कप वापरू शकता.

  2. 2

    एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे. त्यात आलं ठेचून घालावे.

  3. 3

    परत २ मिनिटे उकळी येऊ द्यावी. तोपर्यंत बाकीचा मसाला कुटून घ्यावा.

  4. 4

    नंतर कुटलेला मसाला त्यात टाकून साखर आणि चहा पाउडर घालून ३-४ मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर त्यात दूध घालून ५ मिनिटे परत चहा उकळू द्यावा.
    (स्ट्रॉंग चहा हवा असल्यास अजून थोडी उकळी येऊ द्यावी.)

  5. 5

    गरमा गरम मसाला चहा प्यायला तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
रोजी
Kalyan West.

टिप्पण्या

Similar Recipes