पेढे (pedhe recipe in marathi)

#दुध
आज आपण होम मेड सिंपल पेढे कसे बनवायचे ते बघुयात.
पेढे (pedhe recipe in marathi)
#दुध
आज आपण होम मेड सिंपल पेढे कसे बनवायचे ते बघुयात.
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत किंवा पॅन मध्ये दूध, साखर, तूप आणि फ्रेश क्रीम चांगले एकत्र करून घ्या.
- 2
आता त्यात थोडी थोडी करून मिल्क पावडर ऍड करा आणि चांगले मिक्स करा. मिल्क पावडरच्या गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्या.
- 3
आता हे मिश्रण मध्यम आचेवर एकदम घट्ट होईस्तोवर शिजवा,शिजवताना ते ढवळत रहा. जेणेकरून परत मिल्क पावडर च्या गाठी होणार नाही. हे शिजवण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिट लागतील, मिश्रण चमचा आणि भांडे सोडू लागले म्हणजे ते तयार आहे.
- 4
आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड करा, तुम्ही हे मिश्रण चमच्याने ढवळून पण थंड करू शकतात. फक्त मिश्रण पूर्णपणे थंड होणार नाही याची काळजी घ्या.
- 5
आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून हव्या त्या आकाराचे पेढे बनवा. आणि होममेड पेढ्यांचा आनंद घ्या.
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या (4)