हेल्दी मुग बिन स्प्राऊट साईड डिश (moong bean sprout recipe in marathi)

स्प्राऊट्स म्हणजे अंकुरित कडधान्य खाण्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात.
अकुंरित धान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि के भरपूर प्रमाणात असते. या शिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह असतं. यासोबतच मोड आलेल्या धान्यांमध्ये भरपूर फायबर, फॉलेट, ओमेगा 3 फॅटी अॅसिडदेखील असतात. अंकुरित धान्य नियमित खाण्याने तुमच्या शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात. आज मी तुम्हाला मुग बिन स्प्राऊट साईड डिश कशी बनवायची हे सांगणार आहे ही रेसिपी अगदी सहज पाच ते सात मिनिटात बनणारी आहे तसेच आपल्यासाठी फार गुणकारी सुद्धा आहे, चला तर मग रेसिपी बघूया

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम स्प्राऊट्स उकळत्या पाण्यात दोन मिनिट उकळून घ्या.
- 2
नंतर त्यांना गाडून लगेच थंड पाण्यात टाका आणि स्वच्छ धुवा.
- 3
परत स्प्राऊट्स गाळणीने गाळून त्यातले पाणी काढून टाका.
- 4
आता स्प्राऊट्स एका बाऊल मध्ये घ्या त्यात लसूण ॲड करा, त्यापाठोपाठ कांद्याची पात आणि तीळ ॲड करा
- 5
तेल आणि मीठ ॲड करून हाताने चांगले एकजीव करा.
- 6
तुमची मूग बिन स्प्राऊट साईड डिश तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (10)