खतखतं (khatkhat recipe in marathi)

#shravanqueen #cooksnap खतखतं हि रेसिपी माझ्यासाठी नवीन आहे. दिपाली ताईंचे मनापासून आभार त्यांनी खूप छान प्रकारे रेसिपी दाखवली. खूप छान झाली भाजी.
खतखतं (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap खतखतं हि रेसिपी माझ्यासाठी नवीन आहे. दिपाली ताईंचे मनापासून आभार त्यांनी खूप छान प्रकारे रेसिपी दाखवली. खूप छान झाली भाजी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्याचे मध्यम आकाराच्या फोडी कापून घ्याव्या.
- 2
एका पातेल्यामध्ये तेल गरम करून राई, जिरे, कढीपत्ता घालून फोडणी करावी. गाजर व बटाट्याचे तुकडे घालून परतून घ्यावे. अर्धा कप पाणी घालून बटाटे व गाजर शिजवून घ्यावे
- 3
गाजर, बटाटा शिजत आले कि त्यात बाकी च्या सर्व भाज्या घालून शिजवून घ्यावे. मीठ घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे.एक एक करून सर्व भाज्या टाकून मंद गॅसवर परतून घ्या. एक वाफ काढून घ्या. ओलं खोबरं, मिरीचे दाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाफ काढून झाली की शेंगदाणे, मटार आणि खोबर्याचे तुकडे टाकून एकजीव करून घ्या.सर्व मसाले टाका. उकडलेली डाळ टाका
- 4
थोडं पाणी टाका दोन मिनिटे शिजू द्या. त्यानंतर वाटलेला नारळाची पेस्ट टाकायची एक मिनिट शिजू द्या. नारळ टाकल्यावर भाजी जास्त शिजवू नये. कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या