छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)

छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम छोले भिजत ठेवावे चार ते पाच तास. त्यानंतर कुकरला त्याच्या तीन शिट्या कराव्या. पालक स्वच्छ धुऊन घ्यावा.फूड प्रोसेसर किंवा मिक्सर च्या मोठ्या भांड्यामध्ये आलं मिरची लसुण टाकुन त्याची भरड वाटून. त्याबरोबर मध्ये मग पालकाची पाने टाकून मिक्सर पल्स मोड वर फिरवून बारीक करून घ्यावा. नंतर त्यामध्ये शिजवलेले छोले टाकावे त्याचीसुद्धा भरड करून घ्यावी.
- 2
आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ जिरे पावडर छोले मसाला लिंबाचा रस ब्रेडक्रम्स हे सर्व टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.जर तुम्हाला मी मिश्रण थोडे पातळ वाटत असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स थोडे अजून वाढू शकतात. हाताला तेल लावून सर्व टिक्की करून घ्या आणि पंधरा ते वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण जर कटलेट लगेच तळले तर तेलामध्ये फुटू शकतात.
- 3
वीस मिनिटाने कटलेट फ्रीज मधून काढावे, पॅनमध्ये थोडे तेल टाकावे आणि पहिला तेल चांगले गरम करून घ्यावे मग गॅस मध्यम करावा आणि हे कटलेट थंडच पॅनमध्ये टाकावे आणि एका बाजूने छान खरपूस लाल होऊ द्यावेत.
- 4
एका बाजूने छान खरपूस भाजून झाले की मग एक एक करून कटलेट पलटून घ्यावा. दोन्ही बाजूने कटलेट छान परतून झाले की कटलेट च्या एका बाजूला किसलेले चीज टाकावे आणि वितळून द्यावे तुमचे गरमागरम छोले पालक कटलेट तयार आहेत.
- 5
सॉस बरोबर गरमागरम कट्लेट सर्व्ह करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या