पेठा (petha recipe in marathi)

आग्र्याचा पेठा हे खूप प्रसिद्ध अशी मिठाई आहे, सर्वांना ती माहिती आणि आवडती आहे, पेठा ही रेसिपी बनवायला ही सोपी आहे, करून बघा.
पेठा (petha recipe in marathi)
आग्र्याचा पेठा हे खूप प्रसिद्ध अशी मिठाई आहे, सर्वांना ती माहिती आणि आवडती आहे, पेठा ही रेसिपी बनवायला ही सोपी आहे, करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
कावडाच्या फळाला कापून त्यातला सर्व नरम भाग काढून घ्या, आणि त्याचे साधारण 50 mm एवढे तुकडे करून घ्या,नंतर त्या तुकड्यांचा हिरवा भाग काढून घ्या.
- 2
आता कट केलेला तुकड्यांना फोक च्या साह्याने सर्व बाजूंनी होल करून घ्या. नंतर एका मोठ्या भांड्यात सर्व तुकडे बुडतील एवढे पाणी घेऊन त्यात दोन चमचे चुना टाकून चांगले मिक्स करा कवडा चे तुकडे टाकून त्यांना तसे आठ तास भिजत राहू द्या.
- 3
आठ तासानंतर ते तुकडे दोन-तीन वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुऊन घ्या. नंतर धुतलेल्या कवडाच्या तुकड्यांना उकळत्या पाण्यात दहा ते बारा मिनिट फोटो दाखवल्याप्रमाणे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून त्यातले पाणी काढून घ्या.
- 4
आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ त्यासाठी एक किलो साखर मध्ये तीन कप पाणी टाकून ते साखर विरघळेपर्यंत उकडून घ्या, साखर विरघळली की त्यात पाणी काढून घेतलेले पेठ्या चे तुकडे टाका आणि एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्या. मध्येमध्ये तुकडे ढवळत रहा
- 5
आता हे मिश्रण तसेच सहा तास राहू द्या नंतर त्याला पुन्हा आपल्या आवडीनुसार पाक आटेपर्यंत शिजवून घ्या, हे तुकडे एका जाळीवर ठेवून फॅन खाली व चांगले वाळवून घ्या,(मी ब्राऊन शुगर वापरल्यामुळे पेढ्याचा कलर थोडा ब्राऊन आलेला आहे)
- 6
आपला आग्र्याचा पेठा तयार आहे हा पेठा एक वेळेस बनवून तुम्ही महिनाभर खाऊ शकतात,
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या (8)