शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काजू पाच ते सात मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा. दोन्ही कांदे तुकडे करून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट तयार करा.टोमॅटो,लसूण, आलं आणि लाल सुक्या मिरच्या एकत्र करुन पेस्ट करून घ्या. अर्धी वाटी मलई मिक्सरमधून एकजीव करून घ्या.
- 2
आता भांड्यामध्ये तूप घेऊन त्यावर सर्व खडे मसाले टाकून ते गरम होऊ द्या. मग त्यावर कच्चा कांद्याची पेस्ट टाकून गुलाबी रंगाची होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर काजूची पेस्ट घालून मधून मधून हलवून 3-4 मिनिटे शिजवून घ्या. मग त्यात हळद आणि मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या.
- 3
आता त्यामध्ये मिक्सरमधून फिरवलेल्या टोमॅटोची पेस्ट घाला आणि झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्या. दह्यामध्ये धणा पावडर घालून नीट मिक्स करून ते दही या भांड्यातल्या मिश्रणामध्ये घालून मधून मधून हलवून साईड ने तूप सुटायला लागेपर्यंत झाकण ठेवून शिजवा (नाहीतर अंगावर उडेल मिश्रण). मिश्रण दाणेदार होईल, आता त्यात मलई घाला आणि परत शिजवा.
- 4
आता त्या मिश्रणामध्ये कसुरी मेथी, गरम मसाला घालून परत एक ते दोन मिनिटं शिजवून घ्या. सर्वात शेवटी त्यात पनीरचे तुकडे घाला व्यवस्थित मिक्स करून एक वाफ आणून गॅस बंद करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या