मिरची बडा/मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)

"राम राम सा"
"पधारो म्हारो देस" असं म्हणत हा "रंगीलो राजस्थान" अत्यंत आनंदाने आपले दोन्ही बाहू फैलावून नेहमीच आपल्या स्वागतास सज्ज असतो...आणि राजस्थानच्या बाबतीत हेच मला कायम भावत आलेलं आहे.माझंच काय पण जगभरातल्या पर्यटकांचे हे पसंतीचं पर्यटनस्थळ आहे..
भारतीय संस्कृतीचा पाया असलेली सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती.आजही यांच्या खाणाखुणा सापडतात.तर अशी ही राजांची भूमी,मरु भूमी ,राजपुताना प्रदेश...जरी वाळवंटातील भूमी असली तरी नैसर्गिक सौंदर्य, विविधरंगी संस्कृती, ऐतिहासिक स्थळे या भूमीला सूर्याच्या दाहकते पासून दूर करत चंद्राची शीतलता प्रदान करतात..राजस्थान म्हणजे भव्यदिव्यराजमहाल,पुष्करण्या,हवेल्या,
छत्र्या,मंदिरे, रंगीबेरंगीबांधणी,भव्यकिल्ले,उंट
कला आणि लोकसंगीताचा अजोड मिलाफ..उत्साहाचा झरा नुसता...आणि चमचमीत खाद्यपदार्थ,मिष्टान्नांची मेजवानी त्याचबरोबर शाही आदरातिथ्य..
जेवढा दुधातूपाचा हात सोडून ,diet ची चिंता सोडून मुबलक वापर करणारा हा प्रदेश..तेवढेच चमचमीत पदार्थ देखील यांच्या मेनू कार्डवर आपल्या रसना तृप्त करण्यासाठी दिमाखाने हजर आहेत..
या मेनू कार्डवरील एक चमचमीत,Street food म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजे *मिरची बडा*..अहाहा..नुसत्या वासानेच या हिरव्यागार भावनगरी मिरची बड्याच्या प्रेमात पडतो माणूस..
चला तर मग आपणही या भावनगरी मिरचीचा मिरची बडा बनवून या चमचमीत रेसिपीचा प्रेमाने आस्वाद घेऊ या..

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घ्या आणि गार झाल्यावर कुस्करून घ्या.
- 2
भावनगरी मिरचीला उभा छेद देऊन स्प्लिट करून घ्या. मिरची मधील सगळ्या बिया काढून घ्या.
- 3
बॅटरसाठी बेसनामध्ये हळद तिखट मीठ ओवा हिंग चवीपुरते मीठ घालून थोडं थोडं पाणी घालत बॅटर तयार करून घ्या. एकदम पाणी घालू नका त्यांनी गुठळ्या होतात. बॅटर मिडीयम कन्सिस्टन्सी ठेवा.
- 4
उकडलेले बटाटे कुस्करून घ्या त्यात आलं मिरची पेस्ट कोथिंबीर हळद हिंग गरम मसाला लिंबाचा रस चाट मसाला जीरे कांदा साखर चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता कढईत तेल घालून तेल तापल्यावर जिर्याची फोडणी करून घ्या आणि त्यावर वरील मिश्रण चांगले परतून घ्या.हे झाले आपले स्टफिंग तयार..
- 5
वरील स्टफिंग पूर्ण गार झाल्यावर मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्या. अशाप्रकारे सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून मिरच्या तयार ठेवा.
- 6
आता तयार केलेल्या बेसन पिठा मध्ये या स्टफिंग केलेल्या मिरच्या व्यवस्थित घोळवून तापलेल्या त्याला सोनेरी रंगावर तळून घ्या
- 7
अशाप्रकारे तयार झालेला चमचमीत मिरची बडा टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणी बरोबर सर्व्ह करा.
- 8
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)