खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)

खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व सामग्री जवळ ठेवावी.रवा मैदा चाळून घ्यावा. दूध साखर एकत्र करून विरघळून घ्यावी.
- 2
रवा मैदा एकत्र करून त्यात मीठ टाकावे. नंतर तूप चांगले कडकडीत गरम करून त्यात टाकावे.आधी चमच्याने मिक्स करून घ्यावे.
- 3
त्यानंतर हाताने तूप रवा मैद्यात चांगले चोळून घ्यावे, जेणेकरून त्याची मूठ बनेल. त्यानंतर दूध साखर मिश्रण केलेले होते, त्याने पीठ खूप कडक नाही, पण सैल पण नाही असे भिजून घ्यावे. व अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने पुन्हा चांगले मळून घ्यावे.
- 4
आता त्यातील एक मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटावी.त्याची आवडेल त्या आकाराचे शंकरपाळे कापावे. अशाप्रकारे सर्व शंकरपाळे तयार करून घ्यावे.
- 5
गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवून त्यात तळण्याकरता तेल टाकावे. व शंकरपाळे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यावेत.
- 6
अशाप्रकारे सर्व शंकरपाळे झालेले आहेत. मस्त खुसखुशीत शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या (2)