स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस (Stir fried eggs with oriental veggies recipe in marathi)

अंड्याची अनेकांची घट्ट मैत्री असते... असणारच ना, जेव्हा आपल्याला कोणताच पदार्थ शिजवता येत नसतो तेव्हाचा काळ आठवा, तेव्हा अंडे तर आपल्या मदतीला धावून आलेले असते. जबाबदारी समजू लागण्याच्या वयाची, फक्त ऑमलेट आणि चहा बनवू शकणारी एक अख्खी पिढी कोणत्याही काळात अस्तित्वात असतेच. आपल्यापैकी अनेक जणी यातून एक एक पाऊल पुढे टाकत आता होम शेफ बनल्या असतील. पण पहिला दोस्त तर अंडे आहे ना. आजही हाताशी पदार्थ, वेळ किंवा उत्साह कमी असेल तेव्हा हक्काने हात धरु शकतो असा मित्र म्हणजे अंडे.
या दोस्तासोबत हसत, खेळत, उकडत, कापत, तळत, मिसळत बनवलेली ही रेसिपी...
पौष्टिक, चमचमीत, आणि दिसायलाही तितकीच देखणी. तर होऊन जाऊद्या आपल्या किचनमधल्या पहिल्या दोस्तासोबत एक मस्त स्टार्टर!

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे.एका बाऊल मध्ये अंडी फोडून त्यात काळीमिरी पूड, लाल मिरची पूड,बारीक चिरलेली कांद्याची पात व हिरवी मिरची घालून फेटून घ्यावे. एका स्टीमरमध्ये फेटलेली अंडी १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर त्याचे चोकोनी तुकडे कापून घ्यावेत.
- 2
आता मैदा, कॉर्नफ्लोअर, काळीमिरी पूड व मीठ याची एकत्रित पेस्ट करून घ्यावी. अंड्याचे तयार तुकडे त्यात घोळवून तेलात खरपूस तळून घ्यावे. आणि एका प्लेट मधे काढून घ्यावे.
- 3
स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस बनविण्यासाठी प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात सर्वप्रथम बारीक चिरलेला लसूण व आले घालावे. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, पातीचा कांदा, भोपळी मिरची व कांदा घालून व्यवस्थित स्टर करून घ्यावे. आता त्यात सोय सॉस, रेड चिली सॉस, सेजवान सॉस, व्हाईट विनेगर, टोमॅटो केचप घालून पुन्हा एकदा छान परतवून घ्यावे.
- 4
आता त्यात कॉर्नफ्लोअर स्लरी घालून परतवून घ्यावे. ग्रेवी थिक होईपर्यंत परतत राहावे. नंतर त्यात अंड्याचे तळलेले तुकडे घालून एकदा छान सगळे सॉस कोट होईपर्यंत स्टर फ्राय करून घ्यावे. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घालावी.
- 5
स्टर फ्राईड एग्ग्स विथ ओरिएन्टल वेज्जीस तय्यार!!! म्हणून एक नवीन डिश नक्कीच ट्राय करून पहा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या