भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

#मकर मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते त्यावेळी मिक्स भाज्या व फळे ( ह्या सिजन मधल्या ) मिक्स करून त्याची भाजी व बाजरीची तिळ लावलेली भाकरी तिळाची चटणी हा मेनु घरोघरी बनवला जातो चला तर आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते बघुया

कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या निवडुन व कापुन ठेवा व थोड्या वाफवुन घ्या
- 2
तिळ शेंगदाणे सुक व ओलखोबर थोडया तेलात परतुन घ्या व त्यातच आले लसुण जीरे मिक्स करून वाटण करून घ्या टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून ठेवा
- 3
कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी जीरे हिंग कडिपत्ता परतुन त्यात टोमॅटो थोडी कोथिंबीर टाकुन परता व त्यात तयार वाटण टाकुन परता नंतर त्यात हळद धनेजिरे पावडर टाकुन परता
- 4
नंतर त्यात घरगुती मसाला, गोडा मसाला, काश्मिरी तिखट टाकुन परता व तेल सुटेपर्यत शिजवा नंतर वाफवलेल्या भाज्या व मीठ आवश्यक ते नुसार कोमट पाणी टाकुन झाकण ठेवुन भाजी शिजवा
- 5
आपली भोगीची भाजी रेडी बाऊलमध्ये सर्व्ह करा वरून थोडी कोथिंबीर टाकुन किंवा तिळ लावलेली बाजरीची भाकरी व तिळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
- लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
- तीळ ग्रॅनोला बार (til granola bar recipe in marathi)
- पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
- शाही रबडी गुलाबजामून डोनटस (shahi rabdi gulabjamun donuts recipe in marathi)
- खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)

टिप्पण्या (3)