मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी निवडुन फक्त जास्त पाने निवडा ती स्वच्छा पाण्याने धुवुन पाणी निथळुन प्लेटमध्ये काढुन घ्या
- 2
कढईत २ टिस्पुन तेल गरम करून त्यात जीरे टाका जीरे तडतडल्यावर मेथी टाका थोड मीठ टाका व परतुन मेथी शिजवुन घ्या
- 3
शिजलेली मेथी प्लेटमध्ये काढुन थंड करा
- 4
परातीत गव्हाचे पिठ बेसन पिठ ओवा हळद तिखट मीठ टाकाआलं किसुन घ्या कोथिंबीर व मिरच्या कापुन घ्या व पिठात मिक्स करा
- 5
नंतर त्यात दही व शिजलेली मेथी पिठात मिक्स करून घ्या
- 6
पिठ मळुन घ्या नंतर पिठाचे लहान लहान गोळे घेऊन पराठे लाटा
- 7
गरम तव्यावर साजुक तुपावर पराठे खरपुस भाजा
- 8
गरमागरम तयार मेथी पराठे डिश मध्ये सर्व्ह करा सोबत गोड दही व आवळ्याचे लोणच दया
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)