साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#ब्रेकफास्ट
#साबुदाणावडा
कूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे साबुदाणा वडा बनवला . जबरदस्त असा हा नाश्ता चा प्रकार आहे जवळपास सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. त्यात आज एकादशीचा दिवस साबुदाणा वडा बनवला आपल्याकडे सगळेजण हे बोलत असतात घरात एकाची एकादशी असते एकाची एकादशी म्हणजे पूर्ण घराची एकादशी असते म्हणजे जो पण पदार्थ बनेल उपवासाचा साबुदाणा खिचडी असो काही ही असो ते पूर्ण घरातले मेंबर खाणार. म्हणजे एकाच्या मागे पूर्ण घराची एकादशी तीही फक्त उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी, त्यात अजून एक म्हण ची भर घातलेली आहे आपण 'एकादशी दुप्पट खाशी' फराळाच्या पदार्थांचा असच होते खूप चविष्ट आणि छान लागतात आपल्याकडे बऱ्याच छोट्या मोठ्या हॉटेल कॅन्टीनमध्ये साबुदाणा वडा आपल्याला नासत्यात मिळतोच साबुदाणा खिचडी पेक्षाही चविष्ट लागतो,मग तो हेल्थ साठी चांगला आहे किंवा नाही त्याचा विचार येत नाही
मग अशा वेळेस आप्पेपात्रात वडाच्या जागेवर आपे ही बनवू शकतो कमी तेलात आप्पे तयार होतात. माझ्या पॉटलक पार्टीत मी बऱ्याच दा साबुदाणा वडा बनवून नेला आहे सगळ्यांना माझ्या हातचा वडा आवडतो आवर्जून मीच करून आणावा असा हट्ट असतो मैत्रिणींचा तो हट्ट पूर्ण करावा लागला. तर नक्की करून बघा साबुदाणा वडा रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मीनीट
4/5 व्यक्ती
  1. 1 1/2 कपसाबूदाना
  2. 3मिडीयम साइजचे बटाटे उकडलेले
  3. 2 टेबलस्पूनअद्रक मिरची पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनजीरे
  5. चवीनुसारसेंध मीठ
  6. 1 टेबलस्पूनसाखर
  7. 1 टेबलस्पूनलिंबाचे रस
  8. 1/2 टेबलस्पूनमिरची पावडर
  9. 1/3 कप शेंगदाणा पावडर
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मीनीट
  1. 1

    सर्वप्रथम साबुदाणा घेऊन व्यवस्थित धुऊन रात्रभर भिजत घालून घेऊ. रात्रभर साबुदाणा भिजत घातल्यामुळे साबुदाणा छान फुलून नरम होतो

  2. 2

    सकाळी साबुदाणा छान भिजल्यावर हाताने मोकळा करून घेऊ. आता वेगळ्या पॉटमध्ये साबुदाणा घेऊन त्यावर उकडलेले बटाटे कुस्करून किंवा किसून घ्यायचे, शेंगदाण्याची पाउडर, अद्रक मिरचीची पेस्ट, सेंधा मीठ, जीरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ

  3. 3

    आता लाल मिरची पावडर आणि साखर टाकून वरून अर्धे निंबाचे रस पिळुन घेऊ. लिंबाच्या रसामुळे वडे जास्त तेल पीत नाही तेलकट होत नाही. ही वड्या ची मूख्य टीप आहे. उपवासात तुम्ही कोथिंबीर खात असाल तर टाकू शकतो आम्ही कोथिंबीर खात नाही म्हणून मी टाकली नाही.

  4. 4

    आता पूर्ण साबुदाणे व्यवस्थित हाताने मिक्स करून पिठासारखा गोळा तयार करून साईडला दाबून लावून घेऊ.

  5. 5

    आता हाताला थोडे पाणी लावून एक एक गोळा हातावर घेऊन चपटे असे गोल गोल वडे तयार करून घेऊ

  6. 6

    वडे तळण्यासाठी मी शेंगदाण्याचे तेल वापरले आहे शक्यतो मी उपवासाच्या दिवशी शेंगदाण्याचे तेल वापरते. तेल चांगले गरम करून घ्यायचे. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करून द्यायचं आता तयार वडे तेलात सोडून तळून घेऊ

  7. 7

    एका साईडने तळून झाल्यामुळे पलटून दुसऱ्या साईडने ही तळून घेऊ लाल रंगावर वडे खरपूस तळून घेऊन वडे छान फुलून जातात. वडे तळताना हा गोल प्रकारचा झारा वडे तळत असताना त्याच्यावरती उलटा ठेवून द्यायचा यामुळे अचानक वडा फुटल्यावर आपल्या अंगावर उडत नाही.
    बऱ्याच दा वडे तळत असताना एखादा साबुदाणा फुटून बाहेर उडतो तसे नको व्हायला म्हणून असा झारा उलटा वड्या वर ठेवून द्यायचा.

  8. 8

    अशाप्रकारे सगळे वडे तयार करून तळून घेऊ. छान टमटम फूललेले लालसर खरपूस असे वडे तयार होतात
    दिल्या प्रमाणानुसार 25 मिडीयम साईज चे वडे तयार होतात.

  9. 9

    तयार वडे ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सर्व करू

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes