गावरान शेपू झटका (gavran sepu zhatka recipe in marathi)

#GR गावरान म्हणले की खुप स्पेशल व मातिशी व अगदी आपली व ठसकेदार संस्कृती व खाद्य परंपरेशी वलयांकित असलेले नाते उजागर होते. त्या नात्याने जोडलेले पदार्थ मधील ही एक *गावरान शेपू झटका*. जो मी इथे शेअर करत आहे.

कुकिंग सूचना
- 1
भाजी धुन बारीक चिरून घ्या. कांदा चिरून घ्या. मिरची लसूण छान ठेचून घ्या.
- 2
मातीच्या कढईत तेलाची फोडणी करा. मातीच्या भांड्याने छान गावरान स्वाद भाजीला येतो. त्यात हळद हिंग तिखट घाला. मग मिरची, लसूण ठेचा घाला. आणि मग कांदा घालून 2-4मिनिटं परतून घ्या.
- 3
आता त्यात शेपू, मीठ, साखर घालून भाजी छान एकजीव हलवा. भाजी तयार होई स्तोवर परता.
- 4
भाजी तयार झाली की हा * गावरान शेपू झटका* गरमा गरम छान केळीचे पान/
पत्रावळी, पितली थाळी मध्ये वा प्लेट मध्ये भाकरी सोबत सर्व्ह करा. त्यासोबत छान कांदा मिरची पण द्या. मी नाचणी ज्वारी भाकरी सोबत सर्व्ह केली आहे.*गावरान शेपू झटका* अतिशय आठवणीत राहणारा व गावची आठवण व आनंद देणार पदार्थ आहे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या