झणझणीत शेपू मुटके (sepu mutke recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#GR शेपूचे झणझणीत मुटके , त्या बरोबर कांदा, शेंगदाणे ,व गोडाचा चुरमा थाळीत वाढा , पहा फूर , फूर असा ओरपलेला आवाज येतो कीं नाही ?

झणझणीत शेपू मुटके (sepu mutke recipe in marathi)

#GR शेपूचे झणझणीत मुटके , त्या बरोबर कांदा, शेंगदाणे ,व गोडाचा चुरमा थाळीत वाढा , पहा फूर , फूर असा ओरपलेला आवाज येतो कीं नाही ?

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 सर्व्हिंगस
  1. 150 ग्रॅमगहू पीठ
  2. 1.5 टेबलस्पूनबारीक चिरलेला शेपू
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. 2इंचाचे 2 खोबऱ्याचे तुकडे
  5. 1.5 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनकाळा मसाला
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. चवीपुरते मीठ
  10. चिमुटभरहिंग
  11. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 6-7पान कढीपत्ता
  13. 1लाल मिरची
  14. 500 मि.लि.पाणी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    150 ग्रॅम (दीड वाटी) गव्हाचे पीठ घेऊन,त्यांत 2 टिस्पून मोहन तेल, 3/4 टिस्पून लाल तिखट, हळद,मीठ, चिमूटभर हिंग व बारीक चिरलेला शेपू टाका. हलक्या हाताने घट्ट, पण मऊशार,दशम्यांच्या कणकेप्रमाणे कणिक मळा. त्याला तेलाचा हात लावून ती 5 -7 मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    कणिक भिजे पर्यंत, खोबरे,लसूण,काळा मसाला,1/4 लाल तिखट,1/2 टेबलस्पून कोथिंबीर टाकून,मिक्सरवर खोबर्‍याचे वाटण तयार करून घ्या.
    आता कणकेचे बारीक लांबसर रोल करा.

  3. 3

    गॅस वर कुकर ठेवून त्यांत 500 मिली लिटर पाण्याचे आधण ठेवा.त्यांत चवीपुरते मीठ व खोबर्‍याचे अर्धे वाटण टाकून,गॅस बारीक फ्लेमवर ठेवून, कुकर चे झाकण झाका.

    लांबसर शेंगोळ्याचा लहान तुकडा,एका हातावर घेऊन,तो दुसऱ्या हाताच्या बोटाने दाबून त्याला वाटी सारखा खोलगट आकार येऊ द्या. असे मुटके तयार करा. एका प्लेट मध्ये थोडेसे गव्हाचे पीठ भुरभुरून त्यावर तयार केलेले मुटके ठेवा. म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत व भुरभुरलेल्या पिठामुळे मुटक्यांचा रस्सा दाटसर होईल.

  4. 4

    आता कुकर चे झाकण उघडून त्यात मुटके सोडून पुन्हा झाकण लावा. कुकरला शीट्टी ची वाफ येताच गॅस बारीक करा.शिट्टी होऊ देऊ नका नाहीतर रस्सा बाहेर येण्याची शक्यता असते. बारीक फ्लेमवर 10 ते 12 मिनिटे मुटके शिजू द्या.

    आता लहान कढईत एक टेबलस्पून तेलाची फोडणी ठेवा. त्यात मोहरी टाकून ती तडतडल्यावर,कढीपत्ता, चिमूटभर हळद,लाल तिखट,लाल मिरची टाकून गॅस बंद करा.आता त्यांत उरलेले खोबऱ्याचे वाटण टाका. गरम तेलात ते छान भाजले जाईल.

  5. 5

    अशा प्रकारे झणझणीत फोडणी तयार होईल. कुकरची वाफ गेल्यानंतर ही झणझणीत फोडणी मुटक्यांवर टाका व 3 -4 मिनिटे पुन्हा थोडे शिजू द्या.
    अशा पद्धतीने खमंग व झणझणीत शेपूचे मुटके तयार होतील. वरून थोडीशी कोथिंबीर पेरा.

    वाढताना कांदा, शेंगदाणे, व गोडाचा चूरमा थाळीत ठेवून वाढा. व मस्तपैकी मुटके व रस्सा ओरपू द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes