इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)

इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपल्या आवडीनुसार भाज्या घेऊन त्या बारीक चिरून घेणे. मी कांदा, शिमला मिरची घेतली आहे. आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, कढीपत्ता पाने, मिरचीचे बारीक तुकडे करून घालणे.
- 2
आता या मध्ये कांदा, खिसलेले आले घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घेणे आता या मध्ये शिमला मिरची ही घालून छान मऊ होऊ देणे. आवडत असल्यास हळद घालावी. आता गॅस बंद करावा.
- 3
आता एका बाउल मध्ये रवा घेणे. त्या मध्ये दही, चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घेणे. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून रवा पातळ करून घेणे. खूप पातळ करू नये. घट्टच ठेवावा. आता या मध्ये परतून घेतलेल्या भाज्या रवा बॅटर मध्ये घालून एकत्र करून 15 मिनिट झाकून ठेवावे.
- 4
आता 15 मिनिटे झाली कि आप्पे बॅटर तयार झाले. अगदी आप्पे करायच्या आधी या मध्ये 1 चमचा इनो घालून छान हलवून घेणे बॅटर हलके होऊ लागते. आता गॅस वर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवणे. त्या मध्ये थोडे प्रत्येक होल मध्ये चमच्याने थेंब थेंब तेल घालून घेणे.
- 5
आता हे बॅटर छान एकजीव करून थोडे थोडे आप्पे पात्रात घालावे. पुन्हा वरून कडेने तेल सोडून 3-4 मिनिट झाकण ठेवावे. खालून छान सोनेरी रंगावर भाजून घेणे. आता झाकण काढून वरची बाजू खाली करून भाजावी.
- 6
अशा प्रकारे सगळे आप्पे छान दोनीही बाजूने करून घेणे. खालील फोटो प्रमाणे.
- 7
आता हे तयार आप्पे एका प्लेट मध्ये काढून घेणे. व दुसरे आप्पे त्या पात्रात तेल सोडून घालून घेणे. हे आप्पे गरम गरम पुदिना चटणी सोबत सर्व्ह करावे. खूप छान झटपट नाष्ट्या साठी बनवू शकता. खूपच टेस्टी होतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या (3)