दोडका मुंग डाळ भाजी (dodka moong daal bhaji recipe in marathi)

दोडका ही एक भाजी असून संपूर्ण भारतामध्ये याचे पिक घेतले जाते. दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो.
फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.
दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, पण कडू दोडक्याची भाजी आपलं बनवत नाही ,या भाजीची प्रवृत्ती थंड असते ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्याने थंडावा मिळतो या भाजीची तासीर थंड असते
या भाजीत भर म्हणून मुगडाळ, चणाडाळ कोणतीही डाळ वापरुन ही भाजी तयार करू शकतो आणि आहारातून घेऊ शकतो या भाजीच्या सालीपासून खूप छान चटणी तयार होते अशा प्रकारची चटणी तयार करून घेतली तर जेवणही रुचकर लागते
तर बघूया दोडक्याची भाजी ती भाजी माझी आजी नेहमी बनवायची म्हणून मी याच पद्धतीने बनवते

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दोडके घेऊन त्याची साल वरून काढून लांब लांब काप कट करून घेऊ मुगाची डाळ दहा-पंधरा मिनिटे भिजवून घेउ
- 2
कढईत तेल गरम करून फोडणी तयार करून घेऊन त्यात मोहरी, हिंग टाकून फोडणी करून त्यात कट केलेले दोडक्याचे काप आणि मूग डाळ टाकून दिल्या प्रमाणे मसाले टाकून घेऊ
- 3
भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाकून भाजी शिजवून घेऊन
भाजी शिजत आल्यावर शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ आणि भाजी थोडा वेळ शीजून गॅस बंद करून देऊ - 4
तयार दोडक्याची भाजी, तयार भाजी पोळी, भाकरी, वरण भात बरोबर छान लागते
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (7)